इटलीमध्ये (Italy) एका ८० वर्षीय व्यक्तीने आपल्या ६१ वर्षीय पत्नीची चाकूने वार करून हत्या (Husband Killed Wife) केली. व्यक्तीने शारीरिक संबंध (Sexual Relation) ठेवण्याआधी वायग्रा (Viagra) घेतली होती. पण पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिला. यावरून नाराज झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीवर हत्येचा आरोप लावला आहे त्याचं नाव वीटो कांगिनी आहे. ख्रिसमसवर त्याची पत्नी नतालिया क्यारीचोकने त्याच्यासोबत संबंध ठेवण्याचं प्रॉमीस केलं होतं. पण वीटोने वायग्रा घेतल्यानंतर पत्नीने अचानक संबंध ठेवण्यास नकार दिला.
संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून हत्या
याच गोष्टीवरून वीटो आणि नतालियामध्ये भांडण सुरू झालं होतं. आपल्या पत्नीपेक्षा साधारण २० वर्षाने मोठा असलेल्या वीटोने तिच्यावर तिच्या बॉसच्या जवळ जाण्याचा आरोप लावला. नंतर भांडण इतकं वाढलं की, वीटोने चाकूने वार करत नतालियाची हत्या केली.
हत्येनंतर बेडवर जाऊन झोपला
रिपोर्टनुसार, पत्नीवर चाकूने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून वीटो बेडरूममध्ये गेला आणि झोपला. सकाळी उठल्यावर त्याने कथितपणे नाश्ता केला, आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेला आणि घरी येऊन आपलं काम करू लागला. जसं काहीच झालं नाही असं तो वागला.
दुपारी त्याने नतालियाने ज्या रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम केलं होतं तिथे फोन केला. त्याने तिच्या बॉसला सांगितलं की, तो आता नतालियाला पुन्हा कधीही बघू शकणार नाही. वीटो नतालियाच्या बॉसला म्हणाला की, 'मला माहीत आहे तुम्हा दोघांमध्ये काहीतरी सुरू होतं'.
यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी वीटोच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना वीटोच्या घरात नतालियाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. पोलिसांनी वीटोला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.