Italy PM Giorgia Meloni separation: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचा जोडीदार आंद्रिया जिआम्ब्रुनोपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली. पत्रकार आंद्रिया जिआम्ब्रुनोने अलीकडेच टीव्हीवर वाईट शब्दांत टिप्पणी केली होती. त्यावरून आंद्रिया जिआम्ब्रुनोवर बरीच टीका झाली होती. ब्रेकअपबद्दल जॉर्जिया यांनी फेसबुकवर लिहिले की, माझे आंद्रिया जिआम्ब्रुनो सोबतचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले. आता हे नाते मी संपवत आहे. काही काळापासून आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता आम्ही एकत्र राहू शकत नाही हे मान्य करण्याची वेळ आली आहे.
2015 मध्ये एका टीव्ही शोदरम्यान अँड्रिया जिआम्ब्रुनो आणि जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली होती. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. ते एकत्र राहू लागले. या जोडप्याला 2016 मध्ये जिनेव्हरा ही मुलगी झाली. जॉर्जिया आणि आंद्रियाची मुलगी 7 वर्षांची आहे.
जॉर्जिया कोण आहेत?
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. जॉर्जिया या इटलीच्या उजव्या विचारसरणीचा पक्ष असलेल्या ब्रदर्स ऑफ इटलीच्या नेत्या आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी, 2008 मध्ये, वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी, जॉर्जिया इटलीच्या सर्वात तरुण मंत्री बनल्या होत्या. तिची विधाने आणि उजव्या विचारसरणीचा पुरस्कार यामुळे त्या सतत चर्चेत आहेत. जॉर्जिया स्वत:ला मुसोलिनीचा वारस म्हणवून घेऊन एलजीबीटी समुदायाला विरोध केल्यामुळेही चर्चेत आल्या होत्या. मुस्लिमांना इटलीसाठी धोका असल्याचे त्यांचे विधानही चर्चेत आले. यावर्षी जी-20 परिषदेसाठी जॉर्जिया भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
अँड्रिया कोण आहे? तिची वादग्रस्त टिप्पणी काय?
जॉर्जिया मेलोनी यांचा 10 वर्षांचा भागीदार अँड्रिया जिआमब्रुनो हा एक इटालियन पत्रकार आहे. अँड्रिया जियाम्ब्रुनोने मिलानच्या कॅथलिक विद्यापीठात विद्यार्थी असताना वयाच्या 22 व्या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. अँड्रिया या प्रसिद्ध टीव्ही चेहऱ्याने यावर्षी ऑगस्टमध्ये त्याच्या शोमध्ये बलात्कारावर भाष्य केले होते. एका बलात्कार प्रकरणाबाबत बोलत असताना त्याने पीडितेसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यातील नात्यात मोठे अंतर आले.