Italy : राजकीय नेत्यांकडे किती पैसा आहे? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. राजकारणी निवडणुकीच्या वेळी माहिती देतात, पण त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिसून येत नाही. मात्र, एका बँकेच्या क्लर्कने देशभरातील नेत्यांची संपूर्ण कुंडलीच काढली आहे. प्रत्येक नेत्याकडे किती पैसे आहेत, याची संपूर्ण माहिती मिळवली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यापासून अनेक राजकारण्यांना धक्का बसला आहे.
इटलीतील सर्वात मोठी बँक इंटेसा सानपाओलोमध्ये काम करणाऱ्या ५२ वर्षीय क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. काम करताना त्यांनी देशातील प्रत्येक लहान-मोठ्या राजकारण्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली आहे. यामध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नावाचाही समावेश आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, अनेक राजकारण्यांना धक्का बसला आहे. आता सर्वांना ही माहिती समजली तर आपलं काय होईल, अशी चिंता राजकारण्यांना सतावत आहे.
दरम्यान, बँकेचे क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांनी कोठेही कोणाचीही माहिती लिहून ठेवली नसल्याचं म्हटलं आहे. विन्सेंझो कोविएलो यांनी सांगितलं की, "कामाचा कंटाळा आला होता, त्यामुळं स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या बँक तपशीलांची माहिती घेत होते. हे करताना मला मजा वाटत होती. फेब्रुवारी २०२२ पासून हे करत होतो. आतापर्यंत ६,९७६ लोकांचे बँक डिटेल्स पाहिले आहेत. प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात किती पैसे आहेत? पैसे कुठून आले आणि कुठे पाठवले? हे पाहत होतो."
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केले विरोधकांवर आरोपबँके डिटेल्स संबंधित प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा मोठा मुद्दा बनवला आहे. याप्रकरणी जॉर्जिया मेलोनी यांनी विरोधी पक्षावर आरोप केले आहेत. आपल्याला पदावरून दूर करण्यासाठी विरोधक असे करत आहेत. विन्सेंझो कोविएलो हा फक्त एक प्यादा आहे, असे जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे.
बड्या नेत्यांचे बँक डिटेल्स जाणून घेतलेजॉर्जिया मेलोनी यांच्या व्यतिरिक्त, ज्या बड्या नेत्यांचे बँक डिटेल्स पाहिले आहेत. त्यामध्ये त्यांची बहीण एरियाना, पार्टी ब्रदर्स ऑफ इटलीचे सचिवालय समन्वयक आणि पंतप्रधानांच्या माजी सहाय्यक आंद्रिया जियामब्रुनो यांचाही समावेश आहे. याशिवाय, संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेट्टो, पर्यटन मंत्री डॅनिएला सँटाचे, युरोपीय व्यवहार मंत्री राफेल फिट्टो आणि सिनेटचे अध्यक्ष इग्नाझियो ला रुसा यांचाही या यादीत समावेश आहे.
विन्सेंझो कोविएलो यांची बँकेतून हकालपट्टीयाप्रकरणी इंटेसा सानपाओलो बँकेने क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच, या प्रकाराबद्दल इंटेसा सानपाओलो बँकेने माफी मागितली आहे.