Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी निमलष्करी दलाकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात पाक रेंजर्स माजी पंतप्रधानांना धक्का देत कारमध्ये बसवताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) ने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
पाकिस्तान 'सैराट' झालं! BCCIला कमीपणा दाखवण्याची प्लान B तयार
१ मे रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अटक वॉरंट NAB रावळपिंडीने जारी केले होते. आज अखेर पाक रेंजर्सनी त्यांना इस्लामाबादमध्ये अटक केली आहे. पण, पीटीआयचे म्हणणे आहे की, इम्रान यांना घेऊन जाताना कोणतेही वॉरंट दाखवले गेले नाही. पाकिस्तानी मीडियानुसार, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर पाक रेंजर्सनी अटक केली आहे. इम्रान खान आपल्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन घेण्यासाठी येथे आले होते.
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने ट्विट केले की, आमच्या राष्ट्रीय नायकाला अशा पद्धतीने फरफटत घेऊन जात असल्याचे पाहून मनाला वेदना झाल्या. यात त्यांना दुखापत झाली... त्यांनी पाकिस्तानची अविरत सेवा केली आहे. आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे? राष्ट्रीय नायकाप्रती थोडा तरी आदर दाखवा