शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महिला खेळाडूंचे शोषण करणा-या लिंगपिसाट डॉक्टरला १७४ वर्षे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:41 AM

विद्यापीठापासून ते आॅलिम्पिकपर्यंतच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या अनेक महिला जिम्नॅस्टचे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली, कित्येक वर्षे लैंगिक शोषण केल्याबद्दल लॅरी नास्सर या डॉक्टरला विविध गुन्ह्यांसाठी ४० ते १७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : विद्यापीठापासून ते आॅलिम्पिकपर्यंतच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या अनेक महिला जिम्नॅस्टचे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली, कित्येक वर्षे लैंगिक शोषण केल्याबद्दल लॅरी नास्सर या डॉक्टरला विविध गुन्ह्यांसाठी ४० ते १७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.मिशिगन राज्यातील लॅनसिंगच्या न्यायालयात डझनावारी महिला जिम्नॅस्टनी गेला आठवडाभर साक्षी देऊन डॉक्टर नास्सरच्या लिंगपिसाट वर्तनाचे प्रसंग विशद केले. या साक्षी ग्राह्य धरून महिला न्यायाधीश रोझमेरी अ‍ॅकिलिना यांनी या ‘धोकादायक’ आरोपीची शिक्षा जाहीर केली. निर्विकार चेहºयाने उभ्या असलेल्या आरोपीस शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाल्या, ‘आयुष्यात कधीही तुरुंगातून बाहेर पडण्यास तू लायक नाहीस. तू धोकादाक होतास आणि यापुढेही तुझा धोका कायमच राहील. तू जेथे कुठे जाशील, तेथे निष्पापांची आयुष्ये उद्ध्वस्त करशील!नास्सरला याआधी बालकांचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्याखाली ६० वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात त्याने लैंगिक अत्याचाराच्या १० गुन्ह्यांची कबुली दिली. त्यापैकी सात गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा ठोठावली. बाकीच्या शिक्षा पुढील आठवड्यात सुनावल्या जातील. (वृत्तसंस्था)१४० पीडित खेळाडूंची साक्ष-शिडशिडीत देहयष्टीचा डॉक्टर नास्सर मिशिगन विद्यापीठात नोकरीला होता. त्याने अनेक वर्षे विविध स्तरांवरील महिला जिम्नॅस्ट्सचा डॉक्टर म्हणून काम केले. त्याच्या लैंगिक अत्याचारास रॅचेल जेनहॉलंडर हिने वाचा फोडली. तिच्या फिर्यादीवरूनच खटला उभा राहिला. ‘मी तुमच्यासारखी धाडसी व्यक्ती पाहिली नाही’, असे म्हणून न्यायाधीश अ‍ॅकिलिना यांनी रॅचेलचे कौतुक केले. त्यांनी खटल्याचे कामकाज रॅचेलच्या फिर्यादीपुरते मर्यादित न ठेवता ज्या या डॉक्टरच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडल्या, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानुसार १४० खेळाडूंनी साक्षी दिल्या. यात सिमोन बाइल्स, अ‍ॅली रेझमन, गॅबी डल्गस व मॅक्कायसा मॅरोनी या आॅलिम्पिक सुवर्णपदे जिंकणा-याखेळाडूंचा समावेश होता.डॉक्टर नास्सरने गेल्या १७ नोव्हेंबर रोजी गुन्ह्यांची कबुली दिली. शिक्षा सुनावली जाण्याच्या आधी, न्यायालयात हजर असलेल्या पीडित खेळाडूंकडे वळून त्याने अत्यंत अजिजीच्या स्वरात माफी मागितली. माझ्या वर्तनाने तुम्हाला जो क्लेश सोसावा लागला त्या तुलनेत मला होत असलेला पश्चात्ताप काहीच नाही. कृत्यांबद्दल होत असलेला खेद व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत, असे तो मानभावीपणे म्हणाला.न्यायाधीश अ‍ॅकिलिना यांनी नास्सरला त्याचा पश्चात्ताप बेगडी असल्याचे सुनावले व त्याने न्यायालयास लिहिलेल्या एका पत्राचा हवाला दिला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीने हे पत्र लिहिले होते. आपण कोणावरही लैंगिक अत्याचार केले नाहीत. ते डॉॅक्टर म्हणून केलेले वैद्यकीय उपचार होते, असा दावा त्यात त्याने केला होता.तुम्ही जे केलेत ते उपचार नव्हते व वैद्यकीय उपचार तर नक्कीच नव्हते. मी माझ्या कुत्र्यालाही तुमच्याकडे पाठविणार नाही!-रोझमेरी अ‍ॅकिलिना, न्यायाधीश,मिशिगन न्यायालयतुम्ही एवढे विकृत आहात की, तुमचे विचार मनात येतात, तेव्हा किती राग येतो हे मलाही सांगता येत नाही.- अ‍ॅली रेझमन,महिला जिम्नॅस्ट (कोर्टात आरोपीस उद्देशून)

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळCrimeगुन्हाdoctorडॉक्टर