काबूल: पाकव्याप्त काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. भारतानं गिलगिल-बाल्टिस्तान प्रदेशाच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल, अशीही पाकिस्तानला सतावते आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून तालिबान्यांनीची पाकिस्तानचे कान टोचले आहेत.तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत मुद्द्यात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचंही तालिबाननं सांगितलं आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या ट्रोल सेनेने ट्विटरवर एक निवेदन सामायिक करून काश्मीरमधील सध्या सुरू असलेल्या दहशतवादामध्ये तालिबान सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. तालिबानच्या वक्तव्यानंतर आता पाकिस्तान पुरता तोंडावर आपटला आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्विट करत म्हटले की, " तालिबानी काश्मीरमधील जिहादमध्ये सामील होत असल्याची माध्यमांत प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे." इस्लामिक अमिरात (तालिबान)चे धोरण स्पष्ट आहे की, ते इतर कोणत्याही देशाच्या अंतर्गत मुद्द्यात हस्तक्षेप करत नाहीत. ' यापूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बर्याच ट्विटर हँडलद्वारे असा दावा केला जात होता की, तालिबान काश्मीरमधील दहशतवादात सामील होणार आहे.तालिबानी प्रवक्ता जबुल्ला मुजाहिदचा संदर्भ देत हा दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर तालिबानचे प्रवक्ते सुहेल यांनी स्पष्टीकरण देत संपूर्ण प्रकरणापासून स्वत: ला दूर केले आहे. सोशल मीडियामध्ये अफवा पसरवल्यानंतर भारतीय मोठ्या राजकीय नेत्यांनी पडद्यामागून या बातमीची सत्यता तपासली आहे. भारत अफगाणिस्तानमधल्या देशद्रोह्यांना नेहमीच मदत करत असल्याचा गंभीर आरोपही यापूर्वी तालिबान्यांनी केला होता. तालिबानचे मुख्य नेते शेर मुहम्मद अब्बास स्टानिकाजी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'अफगाणिस्तानात भारताने नेहमीच नकारात्मक भूमिका घेतली आहे. भारताने देशातील गद्दारांना मदत केली आहे. या मुलाखतीची खातरजमा इन्स्टिट्यूट ऑफ करंट वर्ल्ड अफेयर्सचे माजी संचालक हशिम वहाडियार यांनी केली आहे. वहाडियार
जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 8:58 AM