Japan Earthquake: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी जपानमध्ये भीषण भूकंप आला. या भूकंपामुळे जपानचा समुद्र किनारा 800 फुटांपेक्षा जास्त मागे सरकला आहे. नोटो द्वीपकल्पात झालेल्या भीषण भूकंपामुळे ही घटना घडली असून, सॅटेलाइट इमेजेस ही बाब समोर आली आहे. याआधीही 2011 मध्ये भूकंपानंतर जपानची जमीन घसरली होती.
जपानी अंतराळ एजन्सी JAXA च्या ALOS-2 सॅटेलाइट इमेजेसमधून समोर आल्यानुसार, 1 जानेवारी 2024 रोजी जपानमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर समुद्र किनारे 800 फुटांपेक्षा जास्त मागे सरकले आहेत. यानंतर तेथील जमिनीत फरक दिसून येतोय. अनेक बेटे समुद्रसपाटीपासून थोडीशी वर आली आहेत. तसेच समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून दूर गेल्याचेही दिसत आहे.
नोटो द्वीपकल्पात झालेल्या 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे हे झाले आहे. दरम्यान, भूकंपानंतर लोकांना त्सुनामीच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले होते. पूर्वीची आणि आताची परिस्थिती सॅटेलाइट इमेजेमधून स्पष्टपणे दिसत आहे. नाहेल बेल्घरेने त्याच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर केले आहेत.
किनारे वर आले आहेत, समुद्राचे पाणी खाली गेले आहेटोकियो विद्यापीठाच्या भूकंप संशोधन संस्थेच्या संशोधकांनी म्हटले की, भूकंपानंतर नोटो द्वीपकल्पातील कैसो ते आकासाकीपर्यंत दहा ठिकाणी किनारपट्टीची जमीन उंचावली आहे. म्हणजेच समुद्राचे पाणी आणखी खाली गेले आहे. यामुळे किनाऱ्यापासून समुद्रापर्यंचे अंतर वाढलेय. या प्रक्रियेला Coseismic Coastal Uplift म्हणतात.