टोकियो - जपानमध्ये फुकुशिमा किनारपट्टीच्या भागात 7.3 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यामुळे या परिसरातील 20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच या भागात त्सुनामी येण्याचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, समुद्रात 60 किमी खोल हा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची भीषणता दाखवणारे आणि अंगावर काटा आणणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. जपानमधील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये आकाशात विजांचा कडकडाट पाहायला मिळत आहे.
शहरातील सर्व घरं आणि इमारती देखील जोरजोराने हलताना दिसत आहे. यानंतर वीज पुरवठा खंडीत झाला. आणखी एक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ट्रेनचे डब्बे हलताना दिसत असून सपोर्ट हँडलही वेगाने हलत आहेत. सुपरमार्केट्समधील सर्व सामना देखील भुकंपाच्या धक्काने खाली पडलं आहे. ऑफिसमधील कम्युटरसह सर्व सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. जपानची राजधानी टोकियोजवळ बुधवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे 2 जणांचा मृत्यू झाला, तर 88 जण जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने भूकंपाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज येतो.
जपानमधील मियागी आणि फुकुशिमा प्रांतात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. दोन्ही प्रांतांमध्ये लोकांना किनारी भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फुकुशिमामध्ये भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली. जापानमध्ये आलेल्या भूकंपामुळे धावती बुलेट ट्रेन रुळांवरून घसरली. जपानच्या बुलेट ट्रेन ऑपरेटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तोहोकू येथे बुलेट ट्रेन रुळावरून घसरली. त्यावेळी ट्रेनमध्ये 100 प्रवासी होते. परंतु यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. जपानच्या ईस्ट निप्पॉन कंपनीच्या म्हणण्यानुसार, अनेक एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
ओसाकीमधील तोहोकू एक्स्प्रेसवे, मियागी प्रांतातील जबान एक्स्प्रेसवे आणि सोमा, फुकुशिमा यांचा समावेश आहे. भूकंपानंतर उत्तर जापानच्या एका मॉलमध्येही मोठं नुकसान झालं आहे. तसंच यानंतर टोक्योमध्ये इलेक्ट्रीसिटी गेल्यानं 20 लाख घरांमध्ये अंधार पसरला आहे. याच भागात मार्च 2011 मध्ये 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता व त्यानंतर त्सुनामीची लाट आली होती. त्यावेळी फुकुशिमा दाईची अणुप्रकल्पातील शीतकरण प्रक्रिया बंद पडली होती. बुधवारी झालेल्या भूकंपानंतर मियागी व फुकुशिमा भागात समुद्रात एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भूकंपाने टोकियोसह अनेक भागांतील इमारतींना हादरे बसले.