जपानच्या माउंट एसोमध्ये (japan Mount Aso volcano) बुधवारी ज्वालामुखीची उद्रेक झाला. दक्षिण आयलॅड Kyushu मध्ये हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हवामान खात्याने सांगितलं की, हा ज्वालामुखी ३,५०० मीटरपर्यंत आकाशात पोहोचला. याचा खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अजूनही लोकांना या भागात जाण्यास मनाई करण्यात आली आणि जे लोक आजूबाजूला राहत होते त्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे ज्वालामुखीचा धूर आकाशात उंचच उंच पसरत आहे.
रॉयटर्सनुसार, २०१९ मध्ये माउंट एसोमध्ये एक छोटा विस्फोट झाला होता. तेच २०१४ मध्ये माउंट ऑनटेकमध्ये झालेल्या विस्फोटात ६३ लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या ९० वर्षात झालेला हा सर्वात मोठा विस्फोट होता.