टोकिओ : जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांची पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे. जनतेने आपल्या आर्थिक धोरणाला दिलेला हा पाठिंबा आहे, असा दावा अॅबे यांनी केला आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या प्रभावाखाली असून, अॅबे यांनी सुचविलेले उपाय अॅबेनॉमिक्स म्हणून ओळखले जातात. निवडणुकीत अॅबे यांना विजय मिळाला असला तरीही बर्फवृष्टीमुळे मतदानाची टक्केवारी कमी राहिली जनतेने खरच अॅबेनॉमिक्सला मंजुरी दिली आहे काय याबद्दल शंका निर्माण होत आहे. मतदान झाल्यानंतर लगेच घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये अॅबे व त्यांचे सहकारी कोमिटो यांना सर्वाधिक मते पडल्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.
जपानचे पंतप्रधान अॅबे यांची फेरनिवड
By admin | Published: December 15, 2014 3:02 AM