शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जपानचे PM फुमियो किशिदा यांनी मुलावरच घेतली मोठी अ‍ॅक्शन; सरकारी निवासस्थानी केली होती पार्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:04 AM

या पार्टीचे फोटो साप्ताहिक शुकन बुंशुनने प्रसिद्ध केले होते.

टोकियो - जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्या मुलाच्या एका वैयक्तिक पार्टीनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान किशिदा सोमवारी म्हणाले, आपला मुलगा, एका खासगी पार्टीसाठी पंतप्रधान निवासस्थानाचा वापर केल्याची जबाबदारी घेतल्यानंतर, अपल्या कार्यकारी नीती सचिव पदाचा राजीनामा देत आहे. या पार्टीचे फोटो एका मॅक्झिनने प्रसिद्ध केल्यानतंर लोकांमध्ये प्रचंड राग होता. 

AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा मोठा मुलगा तथा त्यांच्या राजकीय व्यवहार कार्यकारी सचिव शोतारो किशिदा (Shotaro Kishida) यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी 30 डिसेंबर  2022 रोजी एका पार्टीसाठी नातलगांसह इतर लोकांनाही आमंत्रित केले होते. या पार्टीचे फोटो साप्ताहिक शुकन बुंशुनने प्रसिद्ध केले होते. 

संबंधित वृत्तानुसार, या फोटोत नवनियुक्त कॅबिनेट प्रमाणे, पंतप्रधानांचा मुलगा आणि त्याचे नातलग रेड कार्पेटवर दाखवण्यात आले होते. तसेच इतर फोटोंमध्ये पाहुण्यांना पोडियमवर उभे केल्याचे दिसत आहे. जसे की, एखादी पत्रकार परिषद सुरू आहे. यानतंर,"राजकीय व्यवहार सचिव म्हणून त्यांचे काम अयोग्य होते. आपण त्यांची जबाबदारी निश्चित करत त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असे किशिदा यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास पत्रकारांना सांगितले. 

किशिदा म्हणाले, गुरुवारी त्यांच्या मुलाच्या जागेवर ताकायोशी यामामोटो यांची नियुक्ती केली जाईल. यावेळी किशिदा यांनी कबूल केले की, त्यांनी थोडक्यात पाहुण्यांचे स्वागत केले होते. मात्र आपण डिनर पार्टीसाठी थांबलो नाही, असेही त्यांनी यावेली सांगितले. एवढेच नाही, तर आपण आपल्या मुलाला या पार्टीसाठी फटकारले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Japanजपानprime ministerपंतप्रधानGovernmentसरकार