न्यूयॉर्क : प्रत्येक घरातल्या मुलाला घरी वा शाळेत किमान एकदा तरी ‘अरे किती नखं वाढवलीस? कापून टाक आधी’ असे लहानपणी सुनावले जातेच. आपल्यापैकी अनेकांनीही कधी तरी असा ओरडा खाल्ला असेलच. पण एक भारतीय आता तब्बल ६६ वर्षांनी आपली नखे कापणार आहे. त्याची नखे कापण्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये होणार आहे.श्रीधर चिल्लाल असे या गृहस्थांचे नाव असून त्यांचे वय आता ८२ वर्षे आहेत. त्यांनी शेवटची नखे कापली १९५२ साली. त्यानंतर त्यांनी नखे कापणेच बंद केले. या वाढलेल्या नखांमुळे त्यांची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे. अर्थात त्यांनी एकाच हाताच्या बोटांची नखे वाढवली आहेत. त्यांच्या पाचही बोटांच्या नखांची एकूण लांबी सुमारे ९१0 सेंटीमीटर इतकी आहे. त्यातील अंगठ्याचे नखच सुमारे १९८ सेंटीमीटरचे आहे.श्रीधर चिल्लाल हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांना रिप्लेज संग्रहालयाने नखे कापण्याची विनंती केली आहे. अर्थात वृद्धापकाळामुळे त्यांना एवढी मोठी नखे बाळगणेही अवघड झाले आहे. ही नखे कापल्यानंतर रिप्लेज संग्रहालयातच ठेवण्यात येणार आहेत. खास नखे कापून घेण्यासाठी श्रीधर चिल्लाल अमेरिकेला गेले आहेत.
६६ वर्षांनंतर प्रथमच पुण्याचे चिल्लाल अमेरिकेत कापणार नखे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:27 AM