Jeff Bezos Yacht Details: Amazon चे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी एक नवीन यॉट(Yacht) म्हणजेच आलिशान नौका खरेदी केली आहे. याची किंमत सुमारे $500 मिलियन (4,000 कोटींहून अधिक)डॉलर आहे. ही जगातील सर्वात उंच यॉट असून, यावर तीन मजले आहेत. 'कोरू' असे या नौकेचे नाव आहे.
जेफ बेझोसही यापूर्वी आपल्या गर्लफ्रेंडसोबत या यॉटवर दिसले होते. बेजोस यांच्या या नवीन यॉटमध्ये पूल, बार टू लाउंज आणि हॉट टबसह अनेक सुविधा आहेत. रिपोर्ट्सनुसार, यॉटच्या समोरील बाजुस बेझोस यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझचा पुतळा बसवला आहे. यॉटवरील पुतळा लॉरेनचा असल्याची पुष्टी कोणीही केली नसली तरी पुतळा दिसायला लॉरेनसारखाच आहे.
हे यॉटला दोन MTU 16V 2000 M72 डिझेल इंजिनने पॉवर मिळते. हे इंजिन मिळून 1958hp पॉवर जनरेट करतात. याशिवाय ही नौका पूर्णपणे पवन ऊर्जेवरही चालवता येते. म्हणजेच ही वाऱ्याच्या मदतीने धावू शकते. यात ट्विन प्रोपेलर बसवले आहेत. यॉटचा टॉप स्पीड 20 नॉट्स (23 mph) आहे. प्रत्येक नौकेसोबत एक सपोर्ट वेसल्सही असते. याच्या सपोर्ट व्हेसलचे नाव अबिओना आहे. हेलिकॉप्टरच्या डेकपासून ते डायव्हिंग डेकपर्यंत, अबिओनामध्ये बरेच काही आहे.