उडत्या तबकड्यांसारख्या (युएफओ- अनआयडेंटिफाइड फ्लार्इंग आॅब्जेक्ट) दिसणाऱ्या जेलिफिशचे नुकतेच अमेरिकेच्या नॅशनल ओशिएनिक अँड अॅटमोस्फेरीक अॅडमिनिस्ट्रेशनच्या सागरी जीवशास्त्रज्ञांच्या तुकडीने प्रशांत महासागरात चित्रिकरण केले. या उडत्या तबकड्यांची (जेलिफिश) नेमकी ओळख पटलेली नाही. त्यांचे शास्त्रीय नाव ऱ्होपॅलोनमॅटीड ट्रॅकीमेडुसा (खोल समुद्रात आढळणाऱ्या जेलीफिशसारख्या) असे आहे. या जेलिफिशना बघणे हे संमोहून टाकणारे आहे. या जेलिफिशचे चित्रीकरण करणाऱ्या तुकडीने जेलिफिशला दोन सोंडेसारखे अवयव असल्याचे म्हटले आहे. दक्षिण प्रशांत महासागरात ही मोहीम संपूर्ण एप्रिलमध्ये चालणार आहे.
उडत्या तबकड्यांसारख्या जेलिफिश महासागरात
By admin | Published: March 11, 2017 12:13 AM