मागील काही दिवसांपासून कार्डियक अरेस्टमुळे मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्यात. अलीकडेच ख्रिसमसच्या दिवशी सकाळी ३२ वर्षीय जेना गुडसोबत असेच काहीसे घडले. जेनाच्या पतीचा रात्री ३ च्या सुमारास अचानक डोळा उघडला तेव्हा शेजारी झोपलेल्या जेनाला पाहताच काहीतरी गडबड असल्याचे जाणवलं.जेनाचा श्वासोश्वास थांबला होता हे पतीच्या ध्यानात आले. मध्यरात्री मृतावस्थेत पडलेल्या पत्नीला सीपीआर देतानाच त्यांनी ९९९ कॉल केला. त्यानंतर काही मिनिटांमध्येच डॉक्टरांची एक टीम रुग्णवाहिकेसोबत घरी आली.
जेनाचा श्वास थांबला होता परंतु मी सातत्याने सीपीआर देऊन तिच्या श्वसन नलिकेपर्यंत ऑक्सिजन पोहचवून तिचा जीव वाचवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबाबत पतीने सांगितले की, मी खूप खुश आणि हैराण होतो. जेनाला रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा चालू व्हावेत यासाठी दोनदा डिफाइब्रिलेटरचा वापर करावा लागला. इंग्लंडमधील ही घटना असून यातील जेना ही शिक्षिका आहे. तिने म्हटलं की, आम्ही वयाच्या १५ व्या वर्षीपासून एकत्र आहोत. त्यामुळे एकमेकांना जवळून ओळखतो. त्यामुळे निश्चितच रस आणि माझ्यात सिक्स्थ सेंस आहे. त्यामुळे निम्म्या रात्री त्याला अचानक जाग आली. पती रसने मला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्याने मला जमिनीवर ओढले. मला श्वास देण्यासाठी सीपीआर देणे सुरू केले. आमचा ३ वर्षाचा मुलगा चार्ली जवळच झोपला होता. रसने फोन करून लाऊडस्पीकरवर ठेवत डॉक्टरांना बोलावले. एकाचवेळी त्याने दोन्ही प्रक्रिया केली. रुग्णवाहिका आल्यानंतर डॉक्टरांनी बेशुद्ध अवस्थेत माझ्यावर उपचार केले. माझे जिवंत वाचणे हा चमत्कारच आहे असं सेंट पीटर हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले. १४ मिनिटे हार्ट बीट थांबल्यानंतर जिवंत वाचण्याची शक्यता केवळ ४ टक्के असते. सुदैवाने माझ्या ब्रेनला काही झाले नाही असं तिने म्हटलं.
दरम्यान, जर पती रसला काही वेळानंतर जाग आली असती आणि त्याने १० मिनिटांनी हार मानून सीपीआर बंद केला असता तर माझा निश्चितच मृत्यू झाला असता. रस केवळ माझा जीव वाचवणारा हिरो नाही तर त्याने चार्लीला त्याची आई पुन्हा दिली. जेनाला दिर्घकाळापासून हार्टबीटची समस्या होती. परंतु डॉक्टरांनी कुठलाही धोका नसल्याचे सांगितले होते. कार्डियक अरेस्ट अचानक हृदयाचे ठोके बंद झाल्यावर येतो. ज्यात व्यक्ती बेशुद्ध होतो. श्वास बंद होतो. काहीच हालचाल करत नाही.