जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 58 लाख 03,099 इतकी झाली आहे. त्यापैकी 25 लाख 08,591 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 57,691 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तेथे आतापर्यंत 17लाख 45,803 रुग्ण झाले असून मृतांचा आकडा 1 लाख 2107 इतका झाला आहे. 4 लाख 90, 130 रुग्ण बरे झाले असले तरी तेथील परिस्थिती अजून बिकट होताना दिसत आहे. अशा या नकारात्मक वातावरणात अमेरिकेतील नागरिकांसाठी गुरुवारी एक सकारात्मक गोष्ट घडली. 103 वर्षांच्या आजी जेनी स्टेंझा यांनी कोरोनावर मात केली आहे आणि त्यांनी याचं सेलिब्रेशनही दणक्यात केलं.
मागील आठवड्यात अमेरिकेतच दुसऱ्या महायुद्धातील साक्षीदार असलेल्या 100 वर्षीय आजींनी 58 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना कोरोनावर मात केली. तत्पूर्वी स्पेनमध्ये 113 वर्षाय आजींनी कोरोनाला हरवल्याचा पराक्रम केला. कोरोनामुळे वयोवृद्धांच्या निधनाचे प्रमाण अधिक असताना गुरुवारी 103 वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली. तिच्या नर्सिंग होममध्ये कोरोनाची लागण झालेल्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांना ताप येऊ लागला आणि त्वरित आयसीयूत दाखल करण्यात आले. कुटुंबीयांनी त्यांच्या जगण्याच्या आशाच सोडल्या होत्या.
डॉक्टरांनीही त्यांच्या कुटुंबीयांना आजींना अखेरचा बाय म्हणण्यास सांगितले होते. दोन मुलं आहेत, तीन नातू, चार पतवंड आणि पतवंडांची तीन मुलं असा आजींचा परिवार आहे. पण, आजींनी हार मानली नाही. त्यांनी कोरोनाला हरवून डॉक्टर आणि कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांची प्रकृती आता सुधरत आहे आणि तीन आठवड्यांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोनामुक्त जाहीर केले.
मग काय सेलिब्रेशन तर बनतंच ना... आजींनी त्वरित बिअर पिऊन सेलिब्रेशन केलं. त्यांचे बिअर पितानाचे फोटो शोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Bad News : खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; एक महिन्याच्या कन्येचं निधन
IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव
MS Dhoniची पत्नी भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय
आयला सचिन... मास्टर ब्लास्टरनं शेअर केला वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या मुलाचा फोटो अन्...
सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण