जाणून घ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा पुढचा टप्पा गेल्या महिन्यात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक मते घेऊन बाजी मारली. मात्र, हा झाला पहिला टप्पा. आता पुढचा टप्पा म्हणजे इलेक्टोरल कॉलेजची बैठक. यात कोणाच्या बाजूने मतदान होते, यावर अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, हे ठरणार आहे. पाहू या काय आहे ही यंत्रणा...
इलेक्टोरल कॉलेजची बैठक कोठे होते?प्रत्येक राज्याचे इलेक्टर्स आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे इलेक्टर्स साधारणत: स्टेट कॅपिटॉलमध्ये (संसद सभागृह) भेटतातमतपत्रिकेच्या माध्यमातून इलेक्टर्स मतदान करतातएक मतपेटी अध्यक्षीय उमेदवारासाठी असते तर दुसऱ्या मतपेटीत उपाध्यक्षपदासाठी मतदान केले जातेमतांची मोजणी झाल्यानंतर निकालपत्रिकेसह इलेक्टर्स सहा प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करतातकोणत्या राज्याने किती मते दिली याची यादी त्या प्रमाणपत्राला जोडलेली असतेते सर्व पाकीटबंद करून सहा पाकिटे विधिद्वारा नियुक्त विविध अधिकाऱ्यांकडे ती पाठवली जातातमात्र, सर्वात महत्त्वाची प्रत सिनेटच्या अध्यक्षांना - म्हणजे अमेरिकी उपाध्यक्ष - पाठवली जातेसंपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर या प्रतीचे वाचन करायचे असतेपुढे काय?इलेक्टोरल कॉलेजने मतदान केले की मतपेट्यांची रवानगी काँग्रेसकडे होतेउपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होतेमतपेटीतून मतपत्रिका काढून त्यांची मोजणी केली जातेबहुमत कोणाला मिळाले, याची घोषणा होते२० जानेवारीला नव्या अध्यक्षाचा शपथविधी सोहळा पार पडतो२७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता अध्यक्षपदी निवडून येण्यासाठीइलेक्टर्स कोण? इलेक्टोरल कॉलेजमध्ये पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी, राजकीय आकांक्षा असलेले उमेदवार किंवा पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते यांचा समावेश असतोपसंतीची मते मिळवणाऱ्या उमेदवारालाच इलेक्टर्सनी मते द्यावीत असा नियम ३२ राज्यांनी केला आहे