न्यूयॉर्क : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी ‘सुपर ट्युसडे’च्या प्राथमिक निवडणुकांमध्ये जवळपास सर्व जागांवर बाजी मारल्याने या दोन नेत्यांतच राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये अंतिम लढत होईल, हे निश्चित झाले आहे.
रिपब्लिकन उमेदवार म्हणून ट्रम्प यांना टक्कर देणाऱ्या निक्की हेली यांना बुधवारच्या प्राथमिक फेरीत देशभरात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी अध्यक्षीय मोहीम स्थगित केली. त्यामुळे ट्रम्प २०२४च्या रिपब्लिकन नामांकनासाठी शेवटचे प्रमुख उमेदवार उरले. ट्रम्प या महिन्याच्या अखेरीस रिपब्लिकन नामांकन मिळविण्यासाठी आवश्यक १२,१५ प्रतिनिधींपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. ट्रम्प यांच्याबरोबर काम करण्यास हेली यांनी नकार दर्शविला आहे.
...तर हेली यांचे समर्थक मतदान करणार नाहीतरिपब्लिकन प्राथमिक आणि कॉकस मतदारांमध्ये केलेल्या एपी व्होटकास्ट सर्वेक्षणात, हेली यांच्या अनुक्रमे ६१ टक्के आणि ७६ टक्के समर्थकांनी सांगितले की, जर ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदासाठी नामांकित झाले तर ते त्यांना मतदान करणार नाहीत.
तिसऱ्यांदा नामांकनट्रम्प यांनी १५ पैकी १४ राज्यांत विजय मिळवला, तर बायडेन यांनी १५ पैकी १५ राज्यांत यश मिळविले. नामांकनसाठी ट्रम्प यांना यश मिळाले, तर ते रिपब्लिकन पक्षाकडून तिसऱ्यांदा नामांकन मिळवतील.