वॉशिंग्टन - नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Joe Biden Swearing Ceremony : जो बायडन यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 22:26 IST
Joe Biden Swearing Ceremony : नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
Joe Biden Swearing Ceremony : जो बायडन यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
ठळक मुद्देडेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीशपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली