Joe Biden: पुतिन यांच्या नाकावर टिच्चून राष्ट्राध्यक्षांची पिझ्झा पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:45 AM2022-03-27T05:45:02+5:302022-03-27T05:45:47+5:30
Joe Biden: युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो शहरामध्ये तैनात अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला
रेजजो : युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो या शहरामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. या दौऱ्यातून बायडेन यांनी रशियाला आव्हान दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध गुन्हेगार असल्याची टीका त्यांनी केली. रेजजोतील नाटो सैनिकांना बायडेन यांनी पिझ्झा पार्टी दिली व त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.
पोलंडमध्ये नाटो देशांच्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावणे व रशियावरील दबाव वाढविणे हा बायडेन यांच्या पोलंडभेटीचा हेतू होता. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाने युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या इतक्या जवळ जाऊन सैनिकांशी संवाद साधला.
युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो शहरामध्ये तैनात अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. सैनिकांना त्यांनी पिझ्झा पार्टी दिली.