Russia Ukraine War : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच अनेक देशांनी यात युक्रेनला साथ दिली आहे. या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russia Vladimir Putin) यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच त्यांना 'वॉर क्रिमिनल' असं संबोधलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एखदा बायडेन यांनी पुतीन यांच्यावर निशाणा साधत त्यांना खुनी हुकुमशाह आणि ठग म्हटलंय. कॅपिटल हिलमध्ये सेंट पॅट्रिक दिनानिमित्त आयोजित वार्षिक फ्रेंड्स ऑफ आयर्लंडच्या लंचदरम्यान बोलताना त्यांनी टीका केली.
"पुतीन हे एक खुनी हुकुमशाह आणि ठग आहेत. त्यांनी युक्रेनच्या लोकांविरोधात अनैतिक युद्ध पुकारलंय," असं बायडेन म्हणले. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर बायडेन सातत्यानं रशियावर टीका करत आहेत. पुतीन यांची क्रुरता आणि त्यांचं लष्कर युक्रेनमध्ये जे करत आहेत, हे अमानवीय आहे, असं काही दिवसांपूर्वी आयर्लंडच्या मालकल मार्टिन यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान पुतीन म्हणाले होते.
यापूर्वी वॉर क्रिमिनल असा उल्लेखयापूर्वी बायडेन यांनी पुतीन यांचा उल्लेख वॉर क्रिमिनल असा केला होता. यानंतर रशियानंही संताप व्यक्त केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य हे अस्वीकार्य आणि अक्षम्य वक्तव्य असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी म्हटलं.