John Caudwell: बाप होणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण समाजाच्या नजरेत बाप होण्याचे एक वय आहे. पण, जगात असे अनेकजण आहेत, जे तरुण वयात नाही, तर उतार वयात बाप होण्याचे सुख अनुभवतात. एका अब्जाधीश व्यक्तीने असेच काहीसे केले आहे. पण, त्याची गोष्ट थोटी वेगळी आहे. हा व्यक्ती वयाच्या 70 व्या वर्षी बाप झाला आहे. ही आनंदाची बातमी त्यानेच आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
दाम्पत्य आनंदी27 मार्च रोजी Phones4u चे सह-संस्थापक जॉन कॉडवेल यांच्या दुसऱ्या पत्नीने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. तिनेच याआधीही 2021 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. आता मुलीच्या आगमनाने दाम्पत्य खूप आनंदी आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असल्याचे दोघांचे म्हणणे आहे. या जोडप्याने त्यांच्या चिमुकलीचे नाव सबेला स्काय ठेवले आहे.
सातवे अपत्यरिपोर्टनुसार, जॉन कॉडवेल यांचे हे सातवे अपत्य आहे. या मुलीच्या जन्मापूर्वी त्यांना 18 वर्षीय जेकोबी, 20 वर्षीय स्कारलेट, 25 वर्षीय रुफस, 34 वर्षीय लिबी आणि 42 वर्षीय रिबेका, अशी पहिल्या पत्नीपासून झालेली अपत्ये आहेत. जॉन कॉडवेल आपल्या कुटुंबासोबत 80 कोटींच्या आलिशान महालात राहतात आणि अतिशय भव्य आयुष्य जगतात.
अब्जाधीश उद्योगपतीजॉन कॉडवेल यांच्या उत्पन्नाचा एक भाग गुंतवणुकीतून देखील येतो. त्यांनी रिअल इस्टेट आणि फॅशन सारख्या अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या आयुष्यातील 70 टक्के संपत्ती दान करण्याचा संकल्प केला आहे. कॉडवेलने त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. स्वतःला आयुष्यात पुढे नेण्यासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या, पण त्याला खरी किक वयाच्या 35 व्या वर्षी मिळाली. तेव्हा त्यांनी मोबाईल व्यवसायात प्रवेश केला होता आणि इथूनच त्यांच्या नशिबाने यू-टर्न घेण्यास सुरुवात केली.