गर्लफ्रेंडच्या घरी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तरुणानं तिच्या घरातून तब्बल १० अब्ज रुपयांची कमाई केली आहे. संपूर्ण जगात या अब्जाधीशाच्या कामाची चर्चा आहे. गर्लफ्रेंडच्या घरी बिछान्यावर पडून तरुणानं १० अब्ज कसे काय कमावले असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
एका ऍपमुळे रातोरात कोट्यधीश झालेल्या तरुणाचं नाव आहे जॉनी बपफारहाट. एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍपच्या माध्यमातून जॉनीनं लॉकडाऊनमध्ये बक्कळ कमाई केली. आता जॉनीचा समावेश इंग्लंडमधील श्रीमंत तरुणांमध्ये होते. २०२० मध्ये संपूर्ण जगात कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. त्यावेळी बरेचसे लोक वर्क फ्रॉम होम करायचे. लोकांची गरज लक्षात घेऊन जॉनीनं हॉपिन नावाचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍप तयार केलं. विशेष म्हणजे त्यावेळी जॉनी गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता. तिच्या बेडरूममध्ये बिछान्यावर लोळत असताना त्याला हॉपिनची कल्पना सुचली.
जॉनीनं सर्वात आधी या ऍपसाठी भांडवल गोळा केलं. त्यानंतर ऍपच्या माध्यमातून जबरदस्त कमाई केली. जॉनीनं मॅनचेस्टर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. २०१८ मध्येच त्याला ऍपची कल्पना सुचली होती. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. २०१८ मध्ये गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये बिछान्यावर पडला असताना त्यानं ऍपसाठी कोडिंग केलं. हॉपिन ऍप झूमप्रमाणेच काम करतं. या माध्यमातून व्हिडीओ कॉल्स करता येतात.
हॉपिन लॉन्च झाल्यानंतर वर्षभरात वापरकर्त्यांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली. त्यामुळे ऍपचं मूल्य ४ खर्व १२ अब्ज ४६ कोटी ७९ लाख ५७ हजारांवर गेलं. यामुळे जॉनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११३ व्या स्थानी पोहोचला. जॉनीनं आता कंपनीतील त्याच्या मालकीचे काही स्टॉक विकले. त्यातून त्याला १० अब्ज रुपये मिळाले.