वॉशिंग्टन : अमेरिकेतील जगप्रसिद्ध औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे.पीडित महिलांचे वकील मार्क लॅनियर यांनी सांगितले की, मिसुरी प्रांतातील सेंट लुईस येथील ज्युरी न्यायालयाने हा निर्णय दिला. ज्युरींमध्ये सहा पुरुष व सहा महिलांचा समावेश होता. सहा आठवड्यांची सुनावणी व आठ तास विचारविनिमय केल्यानंतर ज्युरींनी पीडित महिलांच्या बाजूने निर्णय दिला. महिलांना मिळणाºया रकमेत ५५0 दशलक्ष नुकसानविषयक भरपाई आणि ४.१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेची दंडात्मक भरपाई यांचा समावेश आहे.वैयक्तिक आरोग्यासाठी वापरलेल्या कंपनीच्या पावडरमुळे आपणास गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे महिलांचे म्हणणे होते. त्यांचे वकील मार्क लॅनियर यांनी सांगितले की, आपल्या टाल्क पावडरमध्ये अॅसबेसटॉसचे अंश आहेत, हे सत्य जॉन्सन अँड जॉन्सनने तब्बल ४0 वर्षे दडवून ठेवले. या निर्णयामुळे कंपनीचे संचालक मंडळ जागे होईल आणि अॅसबेसटॉस, टाल्कम आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांच्यातील संबंधाची योग्य माहिती ते वैद्यकीय समुदाय आणि लोकांना देईल, अशी आम्हाला आशा वाटते. (वृत्तसंस्था)>कंपनीचा दावाजॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले की, एकाच खटल्यात २२ महिलांनी कंपनीवर गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा आरोप ठेवला. प्रत्येक तक्रारीतील तथ्य वेगळे आहे. तरी या सर्वच जणींना एकसमान भरपाई दिली आहे. या विरोधात कंपनी अपिल करणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:28 AM