इस्लामाबाद : पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार सिरील अल्मेडा यांना देशातून बाहेर जाण्यास सरकारने मनाई केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून हक्कानी व लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांना संरक्षण मिळत असून त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा पडत चालला आहे. आयएसआयच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त ‘डॉन’ दैनिकात ६ आॅक्टोबर रोजी अल्मेडा यांनी दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे. अल्मेडा हे ‘डॉन’ या दैनिकाचे स्तंभलेखक व बातमीदार आहेत. पाकिस्तान सरकारने माझे नाव बाहेर जाणाऱ्यांवर नियंत्रण असलेल्या यादीत समाविष्ट केल्याचे मला सांगितल्याची माहिती त्यांनी टिष्ट्वटरद्वारे दिली. सरकारच्या या कारवाईचा पाकिस्तान मानवी हक्क आयोगाने निषेध केला आहे. (वृत्तसंस्था)च्अल्मेडा म्हणाले, ‘‘मला कोडे पडले, दु:खही झाले. देश सोडून कुठेही जाण्याचा माझा हेतू नव्हता. पाकिस्तान हे माझे घर आहे. मला वाईट वाटले. हे माझे आयुष्य आहे, माझा देश आहे. मग चुकले कुठे? ’’च्सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याची बनावट बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोमवारी म्हटले होते.
पत्रकार अल्मेडा यांना पाकिस्तान सरकारची देश सोडण्यास मनाई
By admin | Published: October 12, 2016 5:59 AM