रियाद : अमेरिकेच्या दवाबानंतर गायब झालेले पत्रकार व अमेरिकी नागरिक जमाल खाशोगी यांची हत्या झाल्याचे सौदी अरेबियाकडून जवळपास दोन आठवड्यानंतर मान्य करण्यात आले आहे.
सौदी अरेबियाचे अटॉर्नी जनरल यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला केलेल्या चौकशीवरुन असे समजते की, पत्रकार जमाल खाशोगी यांची इस्तांबुलमधील दूतावास परिसरात झालेल्या हल्ल्यात ठार झाले. याप्रकरणी सौदी अरेबियातील 18 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, डेप्युटी इंटेलिजन्स चीफ अहमद अल असीरी आणि प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे कायदे सल्लागार अल कथानी यांचा निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये संयुक्त राष्ट्र पत्रकार जमाल खाशोगी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाच्या तळाशी जाईल, आणि त्यांच्या हत्येचे आदेश दिलेले असल्यास किंवा त्यांना काही बरेवाईट झाल्यास सौदी अरेबियाला मोठ्या शिक्षेस सामोरे जावे लागेल असा इशाराच त्यांनी दिला होता. अखेर, सौदी अरेबियाकडून त्यांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जमाल खाशोगी 2 ऑक्टोबरपासून इंस्तांबूलच्या दुतावासातून बेपत्ता झाले होते. ते वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होते.
(पत्रकाराच्या गायब होण्यामागे सौदीचा हात असेल तर किंमत चुकवावी लागेल - ट्रम्प)