नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : भारतात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी शुक्रवारी एक घोषणा पत्र जारी केले. यानुसार, गेल्या 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या, पण अमेरिकन नागरिक नसलेल्या लोकांवर अमेरिकेत प्रवेश करण्यासंदर्भात (येण्यासंदर्भात) नवे निर्बंध (us travel restrictions) घालण्यात आले आहेत. याच बरोबर, ऑस्ट्रेलियानेही गेल्या 14 दिवसांपासून भारतात असलेल्या आपल्या नागरिकांवर मायदेशी परतण्यासंदर्भात तात्पूरते निर्बंध घातले आहेत. (Journalists Qualified students academics exempt from us travel restrictions on india)
अमेरिकाने आपले नागरिक, ग्रीन कार्ड धारक, त्यांचे गैर अमेरिकन साथिदार तसेच 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसह काही ठरावीक वर्गांसाठी या प्रवासाच्या निर्बंधांतून सूट दिली आहे. तसेच हे प्रवास निर्बंध अनिश्चित काळासाठी लागू करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रपतींच्या पुढील घोषणेनंतरच ते शिथील होतील.
Corona Virus : कोरोना संकटात भारताच्या 'या' जिगरी मित्रानं पाठवली मदत, दोन विमानं दिल्लीत दाखल
बायडेन म्हणाले, ''मी निश्चित केले आहे, की येथे येण्यापूर्वी मागील 14 दिवसांपासून भारतात राहणारे, जे प्रवासी नाहीत अथवा अमेरिकन नागरिक नाहीत, अशा लोकांच्या प्रवेशास निर्बंध घालणे अथवा त्यांना रोखने, अमेरिकेच्या हिताचे आहे.'' हा निर्णय आरोग्य तथा मानव सेवा विभागांतर्गत रोग नियंत्रण तथा प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) सल्ल्याने घेण्यात आला आहे.
जगातील नव्या कोरोना बाधितांचा विचार करता, एक तृतियांशहून अधिक केसेस भारतातून समोर येत आहेत. तसेच तेथे गेल्या आठवड्याभरापासून रोजच्या रोज तीन लाख नवे कोरोना बाधित समोर येत आहेत. असेही बायडेन म्हणाले.
घोषणा पत्रात पुढे म्हणण्या आले आहे, की भारतात बी.1.617, बी.1.1.7, आणि बी.1.351 सह व्हायरसच्या विविध प्रकारांच्या सक्रमणाचा फैलाव होत आहे. या प्रवास निर्बंधांतून विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकारांसह विविध वर्गातील लोकांना सूट देण्यात आली आहे.
...तर 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा -यातच, ऑस्ट्रेलियानेही देशात येण्यापूर्वी 14 दिवसांपूसून भारत राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या स्वदेशागमनावर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. तसेच, या निर्बंधांचे पाल केले नाही, तर पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा अथवा मोठा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियन आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतात संक्रमित झाल्यानंतर परतलेले अनेक लोक ऑस्ट्रेलियात आयसोलेशनमध्ये आहेत. यामुळेच, हे संक्रमण ऑस्ट्रेलियात पसरण्यापासून रोखण्यासाठी, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर या निर्णयाव 15 मेला सुधारणेसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
भारतात कोरोनाची स्थिती - मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 1 हजार 993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 988 इतकी आहे.
एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजारच्या वर -देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 11 हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात 32 लाख 68 हजार 710 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.