शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ज्युनो यान पोहोचले गुरूच्या कक्षेत!

By admin | Published: July 06, 2016 2:12 AM

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या ज्युनो या अंतराळयानाने गेल्या पाच वर्षांत २.७ अब्ज किमीचा खडतर प्रवास करून आपल्या सूर्यमालेतील पाचव्या आणि

केप कॅनव्हेराल : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या ज्युनो या अंतराळयानाने गेल्या पाच वर्षांत २.७ अब्ज किमीचा खडतर प्रवास करून आपल्या सूर्यमालेतील पाचव्या आणि सर्वात मोठ्या गुरु ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. ज्युनो पुढील २० महिने गुरुभोवती प्रदक्षिणा करत असताना त्यातील वैज्ञानिक उपकरणे जी बहुमोल माहिती गोळा करतील त्यातून वायूरूप गोळा असलेल्या या ग्रहाची आणि पर्यायाने सूर्यमालेच्या निर्मितीची गुपिते उलगडणे सोपे जाईल, अशी वैज्ञानिकांना आशा आहे.अमेरिकेच्या पूर्व किनारी प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री ११.५३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी ९.२३) ज्युनोने गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याचा रेडिओ संदेश आला तेव्हा कॅलिफोर्नियातील पसाडेना येथील जेप्रॉपेल्शन लॅबोरेटरीमधील नियंत्रण कक्षात सचिंत मनाने श्वास रोखून बसलेल्या ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी आनंदाचे चित्कार करून व टाळ््या वाजवून जल्लोश केला.जल्लोश करण्याचे कारणही तसेच होते. आकाराने पृथ्वीहून १३०० पट मोठ्या असलेल्या गुरुची प्रचंड शक्तिशाली गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून आत प्रवेश करण्यासाठी ज्युनो यानाने ताशी १.३० लाख मैल एवढा वेग गाठणे गरजेचे होते. ३५ मिनिटे इंजिन चालविल्यावर एवढा वेग गाठला गेला व काम फत्ते झाले. दुसरे महत्त्वाचे काम होते ते प्रवेशासाठी अचूक जागा निवडण्याचे. ६५ चंद्रांवरून असंख्य खगोलिय कणांचा गुरुवर सतत वर्षाव सुरु असतो. एवढ्या वेगाने जाणाऱ्या यानावर यापैकी एक कण जरी आदळला असता तरी ज्युनो नष्ट झाले असते. अशी कोणतीही विनाशक टक्कर न होता ज्युनोने कक्षत प्रवेश करणे ही मोठी उपलब्धी होती.सर्वात दूरवरचा प्रवास...- ज्युनो यानाने केलेला १.७ अब्ज किमीचा प्रवास हा सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही अंतराळ यानाने केलेला सर्वात दूरवरचा प्रवास आहे. - गुरु ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत २५ पट कमी सूर्यप्रकाश पोहोचतो. तेवढ्यावरही यानातील उपकरणे, इंजिन व यंत्रे चालविण्यासाठ लागणारी ५०० वॉट वीज मिळविण्यासाठी ज्युनोला तीन महाकाय सौरपंख बसविलेले आहेत.या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा हेतू ...1) गुरु ग्रह हा वरकरणी दिसतो तसा फक्त हायड्रोडन व हेलियमचा महाकाय गोळा आहे की त्याचा गर्भ पृथ्वीसारखा कठीण आहे? गुरुच्या ध्रुवप्रदेशांभोवती अतिनील प्रकाशाची जी प्रभा दिसते ती कशामुळे? मुख्य म्हणजे गुरु ग्रहावर कोणत्याही स्वरूपात पाणी आहे का? पाण्याचा हा शोध मंगळाप्रमाणे संभाव्य सजीवसृष्टीचा संकेत म्हणू नव्हे तर गुरुची जन्मकहाणी जाणून घेण्यासाठी असेल. 2) गुरुवर पाणी आढळले तर त्यावरून एका वैज्ञानिक सिद्धांताचा पाठपुरावा करण्यास आधार मिळेल. गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सूयार्नंतरचा आकाराने सर्वात मोठा खगोलीय गोल आहे. त्याचे वस्तुमान सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या वस्तुमानाहून दुप्पटीने जास्त आहे. गुरुची सूर्याभोवती प्रदक्षिणेची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत पाचपट लांबवरून आहे.3) त्यामुळे गुरुवर पाणी आढळले तर असा तर्क मांडता येईल की कदाचित या ग्रहाचा जन्म बऱ्याच नंतर झाला असावा व तो आता आहे त्याहून दूरवरच्या स्थानावरून इतर ग्रहांना ढकलत सध्याच्या स्थानावर आला असावा. याच अनुषंगाने कालमानात आणखी मागे जाऊन सूर्यमालेच्या जन्माचे नेमके चित्र स्पष्ट करण्यासही मदत होईल.गुरूच्या अगदी जवळ जाणार...मानवाने गुरु ग्रहाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी विविध प्रकारच्या अंतराळ मोहिमा १९७५ पासून सुरु केल्या. याआधी नासाचे गॅलिलिओ यान गुरु ग्रहाच्या कक्षेत जाऊन आठ वर्षे तेथे राहिले होते. गॅलिलिओने युरोपा, गेनीमेड आणि कॅलिस्टो या गुरुच्या तीन चंद्रांच्या पृष्ठभागाखाली खाऱ्यापाण्याचे साठे असल्याचे पुरावे शोधले होते. ज्युनो हे यान गुरुच्या ढगांच्या आवरणापासून ३,१०० मैल एवढे जवळ जाईल.