शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

काय आहे IS चे खुरासान मॉडेल? काबुल स्फोटाची जबाबदारी घेणारा तालिबानी शत्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 9:56 AM

ISIS-K : आयएस (IS ) या दहशतवादी संघटनेचा सहयोगी ISIS-K ने एकेकाळी उत्तर सीरिया आणि इराकमधील मोठ्या भागावर कब्जा केला होता.

काबुल : काबुल विमानतळावर झालेल्या स्फोटात जवळपास ७२  नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये १३ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबानने (Taliban) ट्विटर पोस्टद्वारे या घटनेचा निषेध केला. तसेच, तालिबानने असेही म्हटले की इस्लामिक अमीरात अफगाणिस्तानमध्ये 'आपल्या लोकांच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवून' होती. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत भारत सरकारने म्हटले होते की, काबूल विमानतळावर ISISच्या हल्ल्याची भीती आहे, असे सीएनएन-न्यूज१८ ला सरकारी सूत्रांनी सांगितले होते.

दरम्यान, स्फोटाच्या घटनेला इस्लामिक स्टेटचा अफगाणी सहयोगी इस्लामिक स्टेट खुरासान (ISIS-K) जबाबदार असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, असे रॉयटर्सने सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. ISIS-K हा तालिबानचा प्रमुख शत्रू मानला जातो. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर देशातील तुरुंगातील अनेक महत्त्वाच्या कैद्यांची सुटका करण्यात आल्याचे समजते.  

कोण आहे ISIS-K?आयएस (IS ) या दहशतवादी संघटनेची सहयोगी ISIS-K ने एकेकाळी उत्तर सीरिया आणि इराकमधील मोठ्या भागावर कब्जा केला होता. २०१५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था पूर्व अफगाणिस्तानात कार्यरत आहे. यातील एका भागाला खुरासान प्रांत असे म्हणतात. या संघटनेत सामील असलेल्यांची  संख्या २२०० पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. तसेच, अमेरिकेच्या सैन्याने अफगानिस्तान सोडल्यापासून हा आकडा वाढत आहे.

नागरिकांसाठी मोठा धोकासेंटर ऑफ स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ ते २०१७ दरम्यान ISIS-K ने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील नागरिकांवर १०० हल्ले केले आहेत. यादरम्यान अमेरिकन, पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यावर सुमारे २५० हल्ले झाले आहेत. तेव्हापासून ही संख्या वाढतच चालली आहे. ITV न्यूज ग्लोबल सिक्युरिटीचे संपादक रोहित कचरू यांनी सांगितले की, ISIS-K अफगाणिस्तानच्या खुरासन भागात ६ वर्षांपासून काम करत आहेत. ISIS-K ने  नागरिकांवर शेकडो हल्ले केले आहेत. अमेरिका, अफगाण सैन्य आणि तालिबान यांनी ISIS-K चा प्रभाव कमी केला आहे, असे म्हटले जाते, परंतु अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी अनेक मोठे हल्ले केले आहेत. मे २०२० मध्ये काबूलमधील प्रसूती केंद्रात झाला होता. या हल्ल्यात नवजात अर्भक आणि मातांसह २४ जण ठार झाले होते. या हल्ल्यामागे ISIS-K चा हात असल्याचे म्हटले जाते.

ISIS-K चे कनेक्शन तालिबान किंवा अल-कायदासोबत? ISIS-K आणि तालिबान यांच्यात वैर आहे. तालिबान जास्त कट्टरपंथी नाही, असे ISIS-K चे म्हणणे आहे. यापूर्वी अफगाणिस्तानातील जमिनीवरून दोन्ही संघटनांमध्ये लढाई झाली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काबूलमधील तुरुंगात बंद असलेल्या ISIS-K च्या कमांडरला तालिबानने गेल्या आठवड्यात ठार मारले होते. दोन्ही संघटनांमध्ये युद्ध सुरू असताना ही शक्यता कमी आहे की, ISIS-K लोकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढण्यासाठी तालिबानच्या पाश्चिमात्य देशांसोबतच्या करारावर सहमत होईल. त्यामुळे असे वाटते की, ISIS-K आणि अल-कायदा एकत्र काम करण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Kabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोटAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान