काबुल - अमेरिकेशी शांततेबाबत चर्चा झाल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावरील हल्ले तीव्र केले. शुक्रवारी, नमाजच्या वेळी राजधानी काबूलच्या पश्चिमेला शेरशाह सूरी मशिदीत झालेल्या IED स्फोटात इमामसह ४ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी २ जून रोजी काबुलच्या डाउन शहरात मशिदीत स्फोट झाला होता.
स्फोटकं मशिदीच्या आत लपवले होते अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे फारच कमी लोक मशिदीत नमाजसाठी पोहोचले. त्यामुळे या स्फोटात कमी लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. असे सांगितले जात आहे की, स्फोटकं मशिदीच्या आत लपवले होते. 2 जून रोजी दुसर्या मशिदीतही स्फोट झाला होता2 जून रोजी काबूलमधील वजीर अकबर खान मशिदीत आयईडीचा स्फोट झाला होता, त्यामध्ये मशिदीचे इमाम मोहम्मद अयाज नियाजी यांचा मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.
अफगाणिस्तानमध्ये सध्या दुहेरी संकट निर्माण झाले आहे, आतापर्यंत 23000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे तर त्यात 1000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. दहशतवादाचा बळी ठरलेल्या अफगाणिस्तानात कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था कोलमडली आहे. अफगाणिस्तानातील कोरोना रूग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सध्या देशात केवळ 400 व्हेंटिलेटर आहेत. अफगाणिस्तानची लोकसंख्या 39 दशलक्ष आहे आणि तेथे फक्त 400 व्हेंटिलेटर आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका
न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही