पाकिस्तानने भारताच्या पाणबुडीला अडविल्याचा दावा केलेली पाणबुडी कोणाची आणि कोणती होती, त्याची ओळख पटली आहे. पाणबुडी तज्ज्ञांनुसार ही पाणबुडी भारताची नुकतीच नौदलाच्या सेवेत आलेली कलावरी असण्याची शक्यता आहे. कारण ही पाणबुडी तेव्हा त्याच भागात समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत होती. यामुळे पाकिस्तानने मनात आणले असते तरी तो या पाणबुडीला साधा धक्काही देऊ शकला नसता.
कलावरी ही फ्रान्सकडून विकत घेतलेली स्कॉर्पिन क्लास पाणबुडी आहे. ही पाणबुडी कराचीपासून 150 समुद्री मैल अंतरावर होती. एवढ्या दूरवरून कोणत्याही देशावर नजर ठेवणे किंवा हेरगिरी करणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैध आहे.
नेव्हल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी नौदलाने जो व्हिडीओ जारी केला आहे, त्यातील पाणबुडीवर दोन मस्तूल दिसत आहेत. यामुळे ही स्कॉर्पिन क्लासची पाणबुडी आहे. यामुळे भारताकडेही अशी पाणबुडी असल्याने आणि कलावरीही तेव्हा त्याच भागात असल्याने कलावरीच असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ रिचर्ड डब्ल्यू स्ट्रिन यांनी सांगितले की, ही स्कॉर्पियन क्लास पाणबुडी आहे.
कराचीपासून ही पाणबुडी 150 मैल दूर होती जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. परंतू तिथे पाकिस्तानचे विशेष आर्थिक क्षेत्रदेखील आहे. येथून जवळपास एवढ्याच अंतरावर भारतीय नौदलाचा ओखा हा तळ आहे. येथून भारतीय नौदलाचा सर्वात मोठा तळ हा मुंबईपासून 400 मैल अंतरावर आहे. यामुळे पाकिस्तानला फक्त पाहतच राहणे हा पर्याय होता.
पाकिस्तान काय म्हणालेलेही पाणबुडी पाकिस्तानी समुद्रात होती. या पाणबुडीला आम्ही आरामात नष्ट करू शकत होतो, मात्र शांततेची संधी म्हणून सोडून दिल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.