एकीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि आताचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अनैतिक संबंधांमुळे चर्चेत असताना सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार व उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पतीही चर्चेत आला आहे. कमला हॅरीस यांच्याबाबत एका मॅग्झीनने धक्कादायक माहिती दिली आहे. यानंतर पती डग्लस एम्हॉफ यांनीही ही बाब स्वीकार केली आहे. याचा कमला हॅरीस यांच्या उमेदवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डग्लस एम्हॉफ यांनी आपण पहिल्या पत्नीला धोका दिल्याचे कबुल केले आहे. एम्हॉफ यांचे त्यांच्या मुलांची देखभाल करणारी नॅनी नाजेन नायलर हिच्याशी अनैतिक संबंध होते. नायलर या एम्हॉफ यांची मुले शिकत असलेल्या शाळेत शिक्षिका होत्या. त्याच एम्हॉफ यांच्या मुलांची देखभालही करायच्या. या लैंगिक संबंधांतून एम्हॉफपासून नायलर या गर्भवती राहिल्या होत्या, असे एका ब्रिटिश टॅब्लॉईडने म्हटले होते.
हे प्रकरण १५ वर्षे जुने आहे, असे एम्हॉफच्या मित्राने म्हटले आहे. तेव्हा एम्हॉफ आणि कमला हॅरीस यांचे लग्न झाले नव्हते. एम्हॉफ यांची पूर्वाश्रमीची पत्नी केर्स्टिनसोबत त्यांनी धोका केला होता. नायलर प्रेग्नंट झाली होती. परंतू तिने मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला होता. यावर खुलासा करताना एम्हॉफनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्वीकार केली. परंतू त्यांनी यात नायलर किंवा तिच्या प्रेग्नंसीचा उल्लेख केला नाही.
यावर केर्स्टिन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. डग, कमला आणि मी मिळून जी मिक्स फॅमिली बनविली आहे, प्रत्यक्षात त्यावर मला गर्व आहे. आम्ही काही कारणांनी लग्न संपविण्याचा निर्णय घेतला होता. डग्लस मुलांसाठी महान पिता आहेत. माझे एक खूप चांगले मित्र बनून राहिले आहेत, असे त्या म्हणाल्या.
चार वर्षांपूर्वी जो बायडेन यांनी एक चौकशी समिती नेमली होती. यावेळी २०२० मध्ये कमला हॅरीस यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी उप राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले होते. यावेळी डग्लसने पहिल्या पत्नीची फसवणूक केली होती हा मुद्दा आला होता. कमला आणि डग्लस यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. दोघांनाही मुलबाळ नाही. डग्लस हे वकील आहेत.