शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘युनो’कडून पाकच्या पत्रास केराची टोपली!

By admin | Published: October 15, 2014 1:40 AM

श्मीरमध्ये हस्तक्षेप करा, तिथे जनमत घ्या, असा गळा काढणा-या पाकला संयुक्त राष्ट्राने चांगलीच चपराक मारली असून

संयुक्त राष्ट्रे : काश्मीरमध्ये हस्तक्षेप करा, तिथे जनमत घ्या, असा गळा काढणा-या पाकला संयुक्त राष्ट्राने चांगलीच चपराक मारली असून, संयुक्त राष्ट्राने या मागणीकडे सरळ दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे, तर काश्मीर प्रश्न भारत व पाक यांनी वाटाघाटीतून सोडवावा, असा सल्लाही दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांना पत्र लिहून अलीकडे भारत-पाक सीमेवर निर्माण झालेल्या तणावाची माहिती दिली होती़ पण त्यात भारताकडूनच गोळीबार होत असल्याचा खोटा आरोप करून स्वत:ची बाजू उजळ दाखविण्याचा प्रयत्न केला होता. हा तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली होती. काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यात संयुक्त राष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी मखलाशीही केली होती. बान यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना या पत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संयुक्त राष्ट्राने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या निवेदनाचा उल्लेख केला. या निवेदनात भारत व पाक यांनी वाटाघाटीतून काश्मीर प्रश्न सोडवावा, असा सल्ला बान की मून यांनी दिला होता. भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमा नियंत्रण रेषेवर हिंसाचार वाढल्यामुळे दोन्ही बाजूंकडे नागरिकांचे मृत्यू होत असून, मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित होत आहेत, याबद्दल मून यांनी चिंता व्यक्त केली होती.