Karachi University Blast: पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा आत्मघाती स्फोट झाला होता. एका महिलेने विद्यापीठाच्या गेटजवळ स्वतःला उडवले, यात तीन चीनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या महिलेच्या पतीच्या पतीचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. त्याने पत्नीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
महिलेच्या पतीचे ट्विटआत्मघाती हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने लिहीले की, "शरीजान, तुझ्या निःस्वार्थी कृतीने मी अवाक् झालो आहे, पण मला तुझा अभिमानही वाटतोय. महरोच आणि मीर हसन खूप चांगले व्यक्ती बनतील आणि त्यांची आई किती महान स्त्री होती, हे नंतर त्यांना कळेल. तू आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहशील."
3 चीनी नागरिकांचा मृत्यूकराची विद्यापीठातील कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट या चिनी भाषा शिक्षण केंद्राजवळ मंगळवारी आत्मघाती स्फोट झाला होता. त्या स्फोट तीन चिनी नागरिकांसह चार जण ठार झाले. त्या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत चीनने चौकशीची मागणी केली आहे.
उच्चशिक्षीत कुटुंबातील महिलादरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठातील चायनीज सेंटरजवळ स्वत:ला उडवणारी महिला उच्चशिक्षीत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने MSc झूलॉजीचे शिक्षण घेतले असून, सध्या ती M.Phil करत होती. तसेच, तिचा नवराही पेशाने डॉक्टर आहे. या महिलेला 8 आणि 4 वर्षांची दोन मुलेही आहेत.
चीनला इशाराबलुच लिबरेशन आर्मीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात चीनला इशारा दिला आहे. त्यांनी पाकिस्तानात सुरू असलेले त्यांचे 'शोषण' प्रकल्प तात्काळ थांबवावेत आणि पाकिस्तानवर कब्जा करण्याचा विचार करू नये, अन्यथा आणखी हल्ले होतील, असे म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडचे शेकडो उच्च प्रशिक्षित स्त्री-पुरुष असे हल्ले करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.