ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10 - रासायनिक गॅस हल्ल्यात 80 जणांचा मृत्यू झाल्यानतंर अमेरिकेने सीरियाच्या हवाईतळावर गुरूवारी जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इवांका ट्रम्प हिच्या सांगण्यानुसार हा हल्ला केला होता अशी माहिती समोर येत आहे.
सिरीयावर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांचं मन वळवण्यात इवांकाने महत्वाची भूमिका पार पाडली होती असं वृत्त इनडिपेंडंट(http://www.independent.co.uk) ने दिलं आहे. या हल्ल्याचा घटनाक्रम आणि रणनितीबाबत ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत सर किम डेरक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे आणि परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन यांना माहिती दिली. अमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्यात इवांका ट्रम्पची महत्वाची भूमिका होती असं डेरक यांनी मे आणि जॉन्सन यांना सांगितलं. काही कागदपत्रांतून ही माहिती उघड झाल्याचं इनडिपेंडंटने म्हटलं आहे.
सिरीयात रासायनिक हल्ल्याचं वृत्त आल्यानंतर इवांका ट्रम्पला धक्का बसला होता, हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर इवांका ट्रम्प दु:खी होती. रासायनिक हल्ल्याचा विरोध तिने ट्विटरवरूनही केला होता.
The times we are living in call for difficult decisions - Proud of my father for refusing to accept these horrendous crimes against humanity https://t.co/yV0oJuC9dE— Ivanka Trump (@IvankaTrump) April 7, 2017
Heartbroken and outraged by the images coming out of Syria following the atrocious chemical attack yesterday.— Ivanka Trump (@IvankaTrump) April 5, 2017
का केला होता अमेरिकेने हल्ला-
सीरियाचे अध्यक्ष बशर असाद यांच्या राजकीय विरोधकांच्या ताब्यात असलेल्या शहरावर असाद सरकारने रासायनिक अस्त्रांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून अमेरिकेने हा हल्ला केला. निष्पाप लोकांचे जीव वाचवण्यासाठी सगळ््या सुसंस्कृत देशांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन अमेरिकेने केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून शायरात हवाईतळावर अमेरिकेच्या युद्धनौकेवरून ५०-६० टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शायरात हवाईतळावरून रासायनिक अस्त्रांनी हल्ला केला गेला होता, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेने असाद यांच्याविरोधात लष्करी कारवाई करावी का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात अशा प्रकारच्या हल्ल्यांना माझा विरोध असेल, असे म्हटले होते. ताज्या हल्ल्यानंतर मात्र, ट्रम्प यांच्या भूमिकेत विरुद्ध बदल झाल्याचे दिसते. पहाटे पावणेचार वाजता अमेरिकेच्या युद्धविमानांनी शायरात हवाईतळाची धावपट्टी, हँगर्स, नियंत्रण मनोरा आणि दारूगोळा विभागांना लक्ष्य केले होते. मॉस्कोहून आलेल्या वृत्तानुसार शायरात हवाईतळावरील नऊ विमाने व इंधनाचे डेपो नष्ट झाले. सीरियाच्या शायरात हवाईतळावर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला सौदी अरेबियाने पूर्ण पाठिंबा दिला. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली.