केनियामध्ये (Kenya) मानसिक रूपाने आजारी ४५ वर्षीय एका व्यक्तीने किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाकूने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट (Choppes off his private part) कापला. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीने बऱ्याच दिवसांपासून औषध घेणं बंद केलं होतं. सुदैवाने डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले.
प्रायव्हेट पार्ट कापण्यामागे वैवाहिक जीवनातील समस्या असल्याचं समजत आहे. त्याच्या परिवाराला या घटनेची माहिती साधारण १६ तासानंतर लागली. त्यानंतर त्याला कसंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अशा केसेसमध्ये जर कुणी अशाप्रकारे आत्महत्येच्या उद्देशाने आपलं लिंग कापण्याचा प्रयत्न करत असेल, तर याला फालसीसाइड म्हणून ओळखलं जातं.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, रूग्णाला घटनेनंतर १६ तासांनी आणण्यात आलं होतं. त्यांनी हेही सांगितलं की, परिवारातील लोक रूग्णाचा कापलेला अवयवही घेऊन आले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, ही व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात येणाऱ्या समस्येमुळे हैराण होता. त्यामुळे यावरून सतत चिंतेत राहणाऱ्या या व्यक्तीने स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारच्या जखमांच्या केसेस दुर्मीळ असतात.
ही संपूर्ण घटना एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. यात पीडित व्यक्तीचं नाव किंवा त्याचा पत्ता देण्यात आला नाही. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आधीतर डॉक्टरांनी त्याच्या कापलेल्या अवयवाला जोडण्याचा निर्णय घेतला. पण तो अवयव कापून बराच उशीर झाला होता आणि योग्यप्रकारे तो ठेवण्यात आला नसल्याने त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. डॉक्टर केवळ असेच अवयव पुन्हा जोडू शकतात, जे संक्रमित नसतील.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचा कापलेला अवयव साधारण १६ तासांपर्यंत असाच पडून होता. अशात तो संक्रमित झाला असण्याची शक्यता जास्त होती. जर डॉक्टरांनी जबरदस्ती तो अवयव जोडला असता तर पीडित व्यक्तीचे इतर अवयव संक्रमित झाले असते. त्याच्या मूत्रमार्गाचं नुकसान झालं असतं. रक्ताची कमतरता किंवा सेप्सिसच्या कारणामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकला असता.
डॉक्टरांनी हे सांगितलं नाही की, रूग्णाच्या शरीरातून किती रक्त वाहून गेलं होतं आणि रक्त कसं थांबवण्यात आलं होतं. नजोरोमधील एगर्टन विश्वविद्यालयातील सर्जन यूरोलॉजी केस रिपोर्टमध्ये लिहिलं की, रूग्णाने बऱ्याच दिवसांधी आपली औषध घेणं थांबवलं होतं.