दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू, केरळच्या दाम्पत्यासह 4 भारतीयांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:13 PM2023-04-16T14:13:33+5:302023-04-16T14:14:40+5:30

सरकारच्या निवेदनात आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही, परंतु पाच मजली अपार्टमेंटमध्ये काही समस्यांमुळे आग लागल्याचे सूचित केले आहे.

kerala couple including 4 indians amoung 16 killed in fire at dubai building | दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू, केरळच्या दाम्पत्यासह 4 भारतीयांचाही समावेश

दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू, केरळच्या दाम्पत्यासह 4 भारतीयांचाही समावेश

googlenewsNext

दुबई : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील वेंगारामध्ये राहणारे 38 वर्षीय रिजेश आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी जिशी, तसेच तामिळनाडूचे रहिवासी अब्दुल कादर आणि सलियाकुंड आहेत.

सरकारी-संलग्न वृत्तपत्र 'द नॅशनल'ने दुबई मीडिया ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या 'दुबई सिव्हिल डिफेन्स' च्या निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या आगीच्या घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. शनिवारी दुबईच्या अल रास भागात आग लागली. येथे दुबईचे मसाले बाजार भरते, जे दुबई खाडीजवळ पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे.

दुबई पोलिसांच्या शवागारात उपस्थित असलेले भारतीय सामाजिक कार्यकर्ते नसीर वतनपल्ली यांच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे की, मृत्यूंमध्ये केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांची ओळख पटली आहे. वतनपल्ली म्हणाले, 'आतापर्यंत आम्ही 4 भारतीयांना ओळखण्यात यशस्वी झालो आहोत, ज्यात केरळमधील एक जोडपे आणि इमारतीत काम करणाऱ्या तामिळनाडूतील दोन पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 3 पाकिस्तानी तरुण आणि एका नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला आहे.

सरकारच्या निवेदनात आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही, परंतु पाच मजली अपार्टमेंटमध्ये काही समस्यांमुळे आग लागल्याचे सूचित केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने इमारत सील केली आहे. त्यामुळे आगीतून वाचलेली सर्व कुटुंबेही रातोरात बेघर झाली. खलीज टाईम्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, 'आम्ही पहिल्यांदा एसीमधून आग निघताना पाहिली. काही मिनिटांनी स्फोटाचा आवाज ऐकू आला... त्यानंतर आग काही वेळातच पसरली आणि धुराचे लोट उठताना दिसत होते.

Web Title: kerala couple including 4 indians amoung 16 killed in fire at dubai building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.