अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील एका अधिकाऱ्यानं शनिवारी मोठा दावा केला. चीन काही काळापासून क्युबातून हेरगिरी करत आहे आणि २०१९ मध्ये त्यांच्या गुप्तचर तळांना अपग्रेड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बेटावर नवीन हेरगिरीच्या प्रयत्नांबद्दलचा अहवाल समोर आल्यानंतर अधिकाऱ्यानं हा दावा केला आहे.
फ्लोरिडापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या बेटावर इलेक्ट्रॉनिक इव्हस्ड्रॉपिंग सुविधा उभारण्यासाठी चीनने क्युबासोबत गुप्त करार केला आहे, असं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने गुरुवारी वृत्त दिलं. दरम्यान, अमेरिका आणि क्युबाच्या सरकारनं या अहवालावर तीव्र शंका व्यक्त केली आहे.
माध्यमांचा दावा आमच्या आकलनापलिकडील आहे, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर बायडेन प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यानं दिली. परंतु हा अहवाल कसा चुकीचा आहे किंवा क्युबामध्ये गुप्तचर तळ उभारण्यासाठी चीनकडून प्रयत्न केले जात आहेत का याबाबात मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हा मुद्दा बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारण्यापूर्वीचा आहे, कारण चीननं जगभरातील गुप्तचर तळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं.
अफवा पसरवत असल्याचा आरोपहे काही नवं नाही, सातत्यानं सुरू असलेला मुद्दा आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनानं २०१९ मध्ये क्युबातील आपले गुप्तचर तळ अपग्रेड केले होते, असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, यावरून चीननं अमेरिकेवर निशाणा साधला ते अफवा आणि आपली बदनामी करत असल्याचा आरोपही केला.
क्युबाकडूनही खंडनक्युबाच्यया सरकारकडून तात्काळ यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. गुरुवारी, क्युबाचे उप परराष्ट्र मंत्री, कार्लोस फर्नांडीझ डी कोसिओ यांनी जर्नलचा अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचं फेटाळून लावला. क्युबा लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये कोणत्याही विदेशी सैन्याची उपस्थिती नाकारत असल्याचंही ते म्हणाले.