इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येहिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनण्यासाठी दबाव आणण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तानातून 8 अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. सिंध प्रातांतल्या या हिंदू मुलींचे अपहरण जबरदस्ती त्यांचा निकाह लावण्यात येतो. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानात अनेक हिंदुना जबरदस्तीने मुस्लिम बनण्यासाठी दबाव आणण्यात आला. अल्पवयीन मुलींना मुस्लिम बनवून त्यांच्याकडून खोटा व्हिडीओ बनविण्यात येतो त्याद्वारे या टोळीतील लोकं कायद्यापासून पळ काढतात.
पाकिस्तानात जेव्हा जेव्हा हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो अशा घटनांमागे एका व्यक्तीचा हात असल्याचं नेहमी बोललं जातं तो व्यक्ती म्हणजे मियॉ मिट्टू
पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा तेथील संसदेत प्रश्न उपस्थित झाला आहे. मियॉ मिट्ठूविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी संसदेत झाली आहे. मात्र तरीही पाकिस्तान सरकारकडून मियॉंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाकिस्तानी संसदेमध्ये या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वाकवानी यांनी हिंदुवरील अत्याचाराविरोधात संसेदत प्रश्न मांडले आहेत.
पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. हळूहळू पाकिस्तानात हिंदुच्या मंदिरांवर लक्ष्य केले जात आहे. दरवर्षी पाकिस्तानात 300 हिंदू मुलींचे अपहरण करण्यात येते असं एका अहवालावरुन दिसून येते.
कोण आहे हा मियॉ मिट्ठू ?पाकिस्तानात हिंदुच्या विरोधात सर्वात जास्त गरळ ओकणारा नेता पीपल्स पार्टीचे माजी खासदार पीर अब्दुल हक यांना मियॉ मिट्ठू नावाने ओळखतात
पाकिस्तानातील हिंदुचे धर्मांतर करण्यासाठी मियॉ यांचा पुढाकार असतो. अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन धर्मांतर करण्यासाठी मियॉ प्रसिद्ध आहेत. 2016 च्या आकडेवारीनुसार मिया मिट्ठू याच्याविरोधात 117 गुन्हे नोंद आहेत.
पाकिस्तानात अनेक वेळा हिंदू लोकांनी मियॉ मिट्ठूविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत. हिंदू लोकांनी मियॉ मिट्ठू यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. पाकिस्तानात कट्टर इस्लामचा प्रचार मियॉं मिट्टू उघड करतात.
मियॉ मिट्ठू यांचे फोटो पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान, पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासोबत आहेत.