शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

तालिबानच्या हल्ल्याला बळी पडलेल्या शाळेत पुन्हा किलबिल

By admin | Published: January 13, 2015 12:22 AM

गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हजारो शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या असून अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्या पेशावरच्या सैनिकी शाळेतही विद्यार्थी परतले आहेत.

पेशावर : गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हजारो शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या असून अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्या पेशावरच्या सैनिकी शाळेतही विद्यार्थी परतले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून धोका असल्याच्या दृष्टीने शाळांची हिवाळ्याची सुटी १२ दिवसांनी वाढविण्यात आली होती. लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी सपत्नीक आर्मी पब्लिक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. या शाळेवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात १३४ विद्यार्थ्यांसह १५० जण मारले गेले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी २० सैनिक तैनात होते. तेथील सुरक्षा व्यवस्था एखाद्या विमानतळासारखी वाटत होती. पेशावर हे शहर पाकिस्तानच्या आदिवासी प्रदेशाच्या सीमेवर असून या भागात नेहमीच दहशतवादी हल्ल्यांची भीती असते. पण गेल्या महिन्यात पेशावर येथील शाळेत झालेल्या हल्ल्यात १३४ मुले बळी पडल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानला धक्का बसला आहे. शाळेत मुलांना पोहोचविण्यासाठी आलेल्या पालकांच्या डोळ्यातही अश्रू होते. भावुक पालकांनी जनरल राहिल शरीफ यांची भेट घेतली. यावेळी शरीफ यांनी भाषण केले नाही; पण देशातील दहशतवाद्यांचा बीमोड करू,असे आश्वासन पालकांना दिले आहे. ज्या पालकांची मुले हल्ल्यात दगावली आहेत ते आई-वडीलही शाळेत आले होते; पण अश्रू वाहत असतानाही त्यांनी जनरल शरीफ यांची भेट घेतली नाही. शाळेत येणे अतिशय दु:खद असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)