शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

आत्मघाती हल्ल्यात पाकस्थित पंजाबच्या गृहमंत्र्यांची हत्या

By admin | Published: August 16, 2015 10:25 PM

आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटाने उडवून देत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानझादा यांची हत्या केली. या भीषण हल्ल्यात पोलीस उपअधीक्षकासह अन्य

लाहोर : आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटाने उडवून देत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानझादा यांची हत्या केली. या भीषण हल्ल्यात पोलीस उपअधीक्षकासह अन्य १३ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. लष्कर-ए-झांगवी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त डॉन न्यूजने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.शादी खेलस्थित गावातील शुजा खानझादा यांच्या घरातील कार्यालयात घुसून या आत्मघाती हल्लखोराने हा भीषण हल्ला केला.अभ्यागत म्हणून आत्मघाती हल्लेखोराने शुजा यांचे घर आणि कार्यालयात असलेल्या इमारतीत प्रवेश मिळविल्यानंतर त्याने स्फोटाने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात अन्य १७ जण जखमी झाले आहेत. हा आत्मघाती स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटात इमारतीचे छत कोसळले. कोसळलेल्या छताच्या ढिगाऱ्याखाली गृहमंत्री शुजा आणि अन्य ३० जण गाडले गेले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार सईद इलाही यांनी गृहमंत्री शुजा खानझादा या आत्मघाती हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यांचे पार्थिवर अटॉक येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात आल्याचे इलाही यांनी सांगितले.या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक शौकत शाह हेही ठार झाल्याचे रावळपिंडी परिक्षेत्राचे आयुक्त झाहीद सईद यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.