गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन एकतर कोमात गेलाय किंवा त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. उत्तर कोरियाच्या एका मोठ्या माजी अधिकाऱ्यानेही किम कोमात गेल्याचा दावा केला होता. मात्र, उत्तर कोरियाने आज पुन्हा फोटो प्रसिद्ध करून किमला काहीही झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या मे महिन्यापासून किम जोंग उन गायब आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे सरकारने सांगितले होते. यावर चांग यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरियाचा (North korea) कोणताही नेता कधीच आपली सत्ता दुसऱ्याला देत नाही. जेव्हा त्या नेत्याला गंभीर आजार होते किंवा तख्तापालट होते तेव्हाच त्याची सत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे हस्तांतरीत केली जाते, असे चांग यांनी म्हटले आहे.
किमची बहीण किम यो जोंग हिला आंतरराष्ट्रीय आणि देशातील जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे किम किम जोंग उन ((Kim Jong Un in Coma) ला काहीतरी बरेवाईट झाल्याचे बोलले जात आहे. उत्तर कोरियाने यावर किम यांचा अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा फोटो जारी केला आहे. यामध्ये ते पूर्णपणे स्वस्थ दिसत आहेत. कोरोना व्हायरस आणि गुरुवारी होणार असलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ते ही बैठक घेत आहेत. कोरियाची अधिकृत सेंट्रल न्यूज एजन्सीने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. असे असले तरीही किमचे हे फोटो जुने आहेत की नाही याबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाहीय.
किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
बुधवारी किम यांनी ही बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. कोरोना महामारी आणि कोरियाची अर्थव्यवस्था या काळात उद्ध्वस्त झाली आहे. उत्तर कोरियाने काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्या देशात कोरोना रुग्ण आहेत की नाहीत याबाबत चकार शब्द काढलेला नाही. गेल्या महिन्यात किम यांचे एक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी देशात कोरोनाने प्रवेश केल्याची शक्यता आहे, असे म्हटले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा
CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा
तुमचा पगार किती? 30,000; मोठी योजना घेऊन येतेय मोदी सरकार
Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?