उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे अत्यंत कडक प्रकारचे शासक मानले जातात. परंतु त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. व्हिडिओमध्ये हुकूमशहा किम जोंग उन रडताना दिसत आहेत. उत्तर कोरियातील घटत्या जन्मदरामुळे हुकूमशहा किम जोंग उन चिंचेत आहेत. त्यांनी देशभरातील महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांना अश्रू अनावर झाले.
उत्तर कोरियातील घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. राजधानी प्योंगयांगमधील महिलांच्या कार्यक्रमात 'राष्ट्रीय शक्ती' मजबूत करण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाच्या महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यास सांगितले आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये हुकूमशहा किम जोंग उन हे रडताना आणि पांढऱ्या रुमालाने डोळे पुसताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुकूमशहा किम जोंग उन किम यांनी उत्तर कोरियातील घटत्या जन्मदरात वाढ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन महिलांना केले. तसेच, जन्मदरातील घसरण थांबवणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे आणि त्यांना चांगले शिक्षण देणे या कौटुंबिक बाबी आहेत, ज्या आपण आपल्या महिलांसोबत मिळून सोडवल्या पाहिजेत, असेही हुकूमशहा किम जोंग उन किम यांनी सांगितले.
दरम्यान, अलिकडच्या दशकात उत्तर कोरियाचा जन्मदर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून दिसून येते. 2023 पर्यंत, उत्तर कोरियामध्ये प्रति महिलेला जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या 1.8 होती. उत्तर कोरियाप्रमाणेच त्याच्या शेजारी असलेल्या दक्षिण कोरियामध्येही जन्मदरात मोठी घसरण होत आहे. दक्षिण कोरियाचा प्रजनन दर जगात सर्वात कमी आहे. जन्मदर घसरण्याची मुख्य कारणे उच्च शाळेची फी, मुलांची काळजी घेण्यास असमर्थता आणि पुरुषकेंद्रित कॉर्पोरेट सोसायटी आहेत.