डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशीपासून ट्रम्प अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. दरम्यान, आता त्यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की, मी किम जोंग उन यांना भेटेन. तो किम जोंग उन यांच्याशी बोलाल का? या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की, हे नक्कीच होईल. ते मला आवडतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात किम जोंग उन यांचीही भेट घेतली होती. याशिवाय, ट्रम्प यांनी यापूर्वी किम जोंग उन यांच्याशी असलेले त्यांचे संबंध चांगले असल्याचे सांगितले आहे. किम जोंग उन एक समजूतदार आणि हुशार व्यक्ती आहे, असं कौतुक ट्रम्प यांनी केले.
बँकेच्या आरटीजीएस ट्रॅन्झॅक्शन सिस्टिमला सुरुंग, डिजिटल चोरट्यांनी उडवले २.३४ कोटी
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ ते २०१९ दरम्यान त्यांच्या पहिल्या कार्यकाळात किम जोंग उन यांची तीन वेळा भेट घेतली होती. १९५३ नंतर पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला भेट दिली होती. त्यांनी २०१९ मध्ये किम जोंग यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात दीर्घ चर्चा केली. जगापासून अलिप्त असलेल्या उत्तर कोरियाच्या सरकारशी चर्चेचा हा प्रमुख पुढाकार डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता.
हुकूमशहा शासक किम जोंग उन हे त्यांच्या विचित्र निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यापासून, त्यांच्या टीमने अनेक वेळा सांगितले आहे की, किम जोंग उन यांच्याशी पुन्हा एकदा संवादाचे मार्ग शोधले जातील. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की किम जोंग उन यांच्याशी थेट चर्चा होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात मतभेद
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी किम जोंग उन यांच्याशी संबंध वाढवणे एवढे सोपे नाही. याचे कारण म्हणजे दक्षिण कोरिया हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे, पण त्यांचे उत्तर कोरियाशी संबंध खूप वाईट आहेत. यामुळे ट्रम्प यांना उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याच्या त्यांच्या पुढाकाराची किंमत दक्षिण कोरियाच्या नाराजीच्या रूपात मोजावी लागू शकते.
तर अमेरिकेच्या मंत्रिमंडळात काही नेत्यांचं मत उत्तर कोरियाविरोधात आहेत. ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केलेले मार्को रुबियो स्वतः किम जोंग उन यांना हुकूमशहा म्हणून संबोधत आहेत.