उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंगने देशात 'सफाई अभियान' सुरू केलं आहे. याअंतर्गत देशातील एका उच्च अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. किम यो जोंगच्या या क्रूर आदेशाने उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. असं सांगितलं जात आहे की, किम यो जोंगने सरकारी एजन्सीमध्ये सफाई अभियान चालवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेडीओ फ्री एशियाने आपल्या रिपोर्टमध्ये दो उत्तर कोरियाई अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, 'प्योंगयांगमध्ये एका मोठ्या अधिकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली हे समजू शकलं नाही. पण आमच्या एका उच्च अधिकाऱ्याकडून समजलं की, आरोपीला किम यो जोंगच्या आदेशावरून गोळी मारण्यात आली आहे'.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या तस्करीबाबत सेंट्रल पार्टीला सांगण्यात आलं होतं. यानंतर डिसेंबर महिन्यात देशाच्या बॉर्डर सिक्युरिटी कमांडच्या एकूण १० सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आलं होतं. त्यासोबत ९ इतर लोकांना तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली होती. सध्या किम यो जोंग अशा लोकांची यादी तयार करत आहे, जे लोक पार्टीच्या सत्तेला आव्हान देऊ शकतात.
उत्तर कोरियाई सूत्रांनी सांगितलं की, किम यो जोंगने तिचा भाऊ किम जोंग उनला याबाबत सांगितलं होतं. पार्टी विरोधात विद्रोह करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. ते असंही म्हणाले की, किम यो जोंगचे विरोधही वेगाने वाढत आहेत. सूत्रांनी असंही सांगितलं की, सेंट्रल पार्टी किम यो जोंगच्या आदेशावर रयांगगांग प्रांतातील सर्व अधिकाऱ्यांची समीक्षा करत आहे. जेणेकरून विद्रोही लोकांची माहिती मिळवली जाऊ शकेल. अनेक लोकांना राजकीय लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या शिबिरातही टाकण्यात आलं आहे.