सिंगापूर - सकाळी साडे सहा वाजता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट झाली. सिंगापूरमधील हॉटेल कॅपेलामध्ये ही भेट झाली. या भेटीत दोघांनी सुमारे 50 मिनिटं एकमेकांशी चर्चा केली. या ऐतिहासिक भेटीतनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, किम जोंग उन आणि माझ्यात मैत्रीपूर्ण संबंध असतील. आमची भेटीत यशस्वी आणि चांगली बातचित झाली. सध्या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे.
आपल्या दोन्ही देशांचे संबंध चांगले असतील, अशी सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तर किम जोंग म्हणाले, तुमची भेट होणं इतकं सहज शक्य नव्हतं. मात्र सर्व अडथळे पार करुन ही भेट झाल्याने मला खूपच आनंद झाला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स व व्हाइट हाउसचे प्रमुख अधिकारी जॉन केली हे आलेत तर किम जोंग उन यांच्याबरोबर मंगळवारी होणाऱ्या बैठकीतील फलनिष्पत्ती चांगलीच असेल, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केला होता. त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च आला आहे.
दोन्ही देशाच्या प्रमुखांनी ऐतिहासिक भेटीपूर्वी पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला खूपच आनंद होत आहे. आमच्यात सकस चर्चा होणार आहे. आमची भेट यशस्वी होईल यात शंक नाही. ही भेट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. आमच्या भेटीमुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील, यात मला शंका वाटत नाही
म्हणून ऐतिहासिक भेटीला महत्व?काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.