Controversy on Kohinoor Diamond: ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक 6 मे 2023 रोजी वेस्टमिंस्टर एब्बेमध्ये होईल. यादरम्यान त्यांची पत्नी कॅमिला यांना राणीच्या रूपात हिरेजडीत मुकूट घातला जाणार. पण या इव्हेंटआधीच मुकूटावरून वाद पेटला आहे. या वादाचं कारण आहे कोहिनूर हिरा जो महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या मुकूटात लागला आहे.
सगळ्यांनाच माहीत आहे की, या हिऱ्याचा संबंध भारताशी आहे आणि भारताने नेहमीच यावर दावा केला आहे. चर्चा आहे की, पुन्हा भारत ब्रिटनकडे याची मागणी करणार. हे बघता बकिंघम पॅलेस कॅमिला यांना कोहिनूर हिरा असलेला मुकूट न घालण्याचा प्लान करत आहे.
आतापर्यंत चर्चा सुरू होती की, परंपरेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यात राणी कॅमिला यांना कोहिनूर असलेला मुकूट घातला जाणार, पण आता अचानक अशी माहिती समोर येत आहे की, बकिंघम पॅलेसने हा प्लान मागे घेतला आहे. हे भारतासोबतचं नातं आणि संभावित विरोध यामुळे केलं जात असल्याचं समजतं.
रिपोर्टनुसार, नुकताच भारत सरकारने संकेत दिला होता की, ते पुन्हा एकदा कोहिनूर हिरा परत मागतील. भारत खूप आधीपासून हा हिरा भारतात परत आणण्याचा विचार करत आहे. महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ही मागणी आता अधिक वाढली आहे. अशात ब्रिटेन हिरा दाखवून दोन्ही देशातील तणाव वाढवणार नाही. हेच कारण आहे की, बकिंघम पॅलेस राज्याभिषेक सोहळ्यात राणी कॅमिला यांना कोहिनूर हिरा असलेला मुकूट न घालण्याचा विचार करत आहे.