दुबई : सौदी अरेबियाचे राजे सलमान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सौदीची राजधानी रियाधमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती शाही दरबारने दिली आहे. यानंतर ही माहिती सौदी प्रेस एजन्सीने अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे.
किंग सलमान हे 84 वर्षांचे असून रियाधच्या ‘शाह फैजल स्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये भरती आहेत. त्यांच्या पित्ताशयाला सूज आल्याने त्यांची तपासणी सुरु आहे. एजन्सीने यावर कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. कोरोना व्हायरसमुळे किंग सलमान गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शाह सलमान हे 2015 पासून सौदीवर राज्य करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमानला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.
जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या राजाची तब्येत खराब झाल्याचे समजताच इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काधिमी यांनी सौदी अरेबियाचा दौरा रद्द केला आहे. किंग सलमान हे मुस्लिमांचे पवित्र स्थान मक्केचे संरक्षक आहेत. ते जवळपास 50 वर्षे रियाधचे गव्हर्नर राहिलेले आहेत.
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते मोहम्मद बिन सलमानने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सौदीच्या तरुणांमध्ये मोहम्मद बिन सलमान खूप लोकप्रियही आहेत. त्यांनी महिलांना वाहन चालविण्याची परवानगी देणे यासह अनेक सामाजिक प्रतिबंध उठविले आहेत. यामुळे त्यांनी राजे बनण्याआधीच लोकांचे मन जिंकले आहे. त्यांनी महिलांना अधिकाधिक अधिकार दिले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती
कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला
हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर