लंडन : पृथ्वीच्या कठीण थराच्या खाली जाण्यासाठी शास्त्रज्ञ या आठवड्यात हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात करतील.इंटरनॅशनल ओशन डिस्कव्हरी प्रोग्रॅमच्या (आयओडीपी) मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालेल. पृथ्वीच्या आच्छादनापासून (खोलवरील भाग) त्यांना खडकाचा नमुना हवा असल्यामुळे हे छिद्र पाडले जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये संशोधकांना हा कठीण थर नेमका कशापासून बनलेला आहे याबद्दल त्यांची जी समज आहे ती तपासून घेता येईल अशी आशा आहे. पाच ते साडेपाच किलोमीटरचे छिद्र पाडण्यासाठी कित्येक वर्षे लागतील, असे या शास्त्रज्ञांच्या तुकडीचे प्रमुख प्रो. ख्रिस मॅकलिओड यांनी सांगितले. हे छिद्र पाडणारे जहाज जॉईडस् रिझोल्युशन (जेआर) आणि समुद्राचा तळ यांच्यातील ७०० मीटर पाण्याशिवाय हे छिद्र पाडले जाईल. हाच तो प्रसिद्ध खंड/व्यत्यय आहे जेथून भूकंपासंबंधीच्या लाटा या आकस्मिकपणे गती बदलतात.पाठ्यपुस्तकात आतापर्यंत जे सांगितले गेले त्यानुसार पापुद्रा आणि आच्छादनात विभागणी आहे. ही विभागणी अग्निजन्य खडकाची (ग्रॅनाईटस्, बॅसाल्टस् आणि गॅब्रोज) आहे. परंतु प्रो. मॅकलिओड यांना असा व्यत्यय आणखी काही खोलवरच्या ठिकाणी (दाट, ओबडधोबड खडकात पाणी शिरण्यात यशस्वी ठरले आहे व त्यातून सर्पनटिनाईट नावाने ओळखला जाणारा वेगळ्या प्रकारचा खडक तयार होतो) होत असावा असा संशय आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आमची पृथ्वी नेमकी कशापासून बनली आहे याबद्दल जो समज आहे त्यावर फार दूरवरचे परिणाम होतील, असे ते म्हणाले. ही मोहीम एकूण तीन टप्प्यांत चालेल, असे आम्हाला वाटते असे कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी बीबीसी न्यूजला सांगितले. हा सुरुवातीचा दोन महिन्यांचा तपास करण्यासाठी निधी देत आहोत. आम्हाला परत यावे लागेल आणि २०२० पर्यंत हे काम कदाचित पूर्ण होणारही नाही. यापूर्वी पृथ्वीच्या आच्छादनाला भोक पाडण्याचे झालेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले. नियोजित प्रयत्न हा त्यापेक्षा अधिक चांगला असेल. (वृत्तसंस्था)
पृथ्वी माहीत करून घेण्यास सागरात छिद्र करणार
By admin | Published: December 02, 2015 3:44 AM