Video: सर्वांना माहितीये की, इंग्रजांनी बहुमूल्य असा कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटनमध्ये नेला. स्वातंत्र्यानंतर अनेकदा हा हिरा ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी होत असते. हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्रिटनचा राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची पत्नी आणि राणी कॅमिला यांनी राणी एलिझाबेथचा कोहिनूर हिरा जडलेला मुकुट न घालण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, यूकेच्या एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये याच मुद्द्यावर चर्चा सुरू होती. यावेळी लेखिका आणि अँकर एम्मा वेब आणि भारतीय वंशाची पत्रकार नरिंदर कौर यांच्यात भांडण झालं. चर्चेदरम्यान एम्मा वेब यांनी असा युक्तिवाद केला की, हिऱ्याच्या मालकीबद्दल गोंधळ होऊ शकतो. उत्तरात नरिंदर कौर यांनी त्यांना इतिहासाचा धडा वाचण्याचा सल्ला दिला.
कोहिनूर हिरा भारताला परत करादोघांनीही आपली बाजू मांडली, यादरम्यान वाद वाढतच गेला. एम्मा वेबने आपला युक्तिवाद मांडत सांगितले की, त्यावेळी लाहोरवर शीख साम्राज्यही राज्य करत होते, त्यामुळे पाकिस्तानही त्यावर दावा करणार का? शीख साम्राज्याने कोहिनूर हिरा इराणच्या साम्राज्यातून चोरला होता आणि इराणी साम्राज्याने मुघल शासकांवर हल्ला करून तो हिसकावून घेतला होता, त्यामुळे कोहिनूर हिऱ्याच्या मालकीवरून वाद सुरू असल्याचे एम्मा यांनी सांगितले.
यावर भारतीय वंशाच्या पत्रकाराने 'तुम्हाला इतिहास माहीत नाही' असे सांगितले. ही कल्पना वसाहतवाद आणि रक्तपात दर्शवते. हा कोहिनूर हिरा भारताला परत द्या, असे त्या म्हणाल्या. यानंतर भारतीय वंशाच्या पत्रकाराने व्हिडिओ ट्विट करत कोहिनूर हिरा भारताच्या मातीत सापडल्याचे म्हटले. हा कोहिनूर हिरा यावेळी ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो. वसाहतवादातून मिळवलेला हा हिरा ठेवण्याचा त्यांना अधिकार नाही, असंही त्या म्हणाल्या.